Friday, November 22, 2024

धुलिवंदनदिनी माळटेकडी पुलावर फायरिंग प्रकरण; स्थागुशा पथकाने चार आरोपींना पाठलाग करून पकडले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– शहराच्या माळटेकडी रेल्वे उड्डाणपुलावर झालेल्या गोळीबार प्रकरणात चार आरोपींना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली आहे. कसून चौकशी नंतर त्यांना विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. पकडलेले चारही आरोपी पोलिसांच्या हिस्ट्री सीटवर असलेले गुन्हेगार असल्याचे सांगण्यात आले.

धुलीवंदनाचे दिवशी सर्व लोक उत्साहात व आनंदात सण साजरा करीत असताना या दिवशी म्हणजेच 18 मार्च रोजी दुपारी दोन ते अडीच वाजताचे दरम्यान माळटेकडी रेल्वे पटरी उड्डाण पुलावर अनोळखी दोन व्यक्तींनी त्यांचे चेहऱ्याला व डोक्यावर रंग लावून व तोंडावर कपडा बांधून, दुचाकीवर येऊन दीपक धरमपाल बिगानिया (रा. वाल्मीकीनगर, देगलूर नाका, नांदेड) याचा पाठलाग केला. पुर्व वैमनस्यातून त्यास ठार मारण्याच्या ईराद्याने पिस्तूलातून गोळ्या घालून जखमी करून आरोपी पसार झाले होते. या प्रकरणात विमानतळ पोलीस ठाण्यात अनोळखी आरोपींविरुद्ध प्राणघातक हल्ला व भारतीय हत्यार प्रतीबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नांदेड परिक्षेत्राचे पोलिस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी गुन्ह्याच्या घटनास्थळी भेट देऊन, आरोपी शोध घेण्यासाठी मार्गदर्शन करून सूचना दिल्या. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांनी स्वतः व त्यांचे अधिपत्याखालील सहायक पोलिस निरीक्षक पांडुरंग भारती यांनी गुन्ह्याचे घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर गुप्त माहितीवरुन या गंभीर घटनेची सविस्तर गोपनिय माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी नांदेड शहरातील कुख्यात गुन्हेगार ईश्वरसिंघ गिरणीवाले, बजरंग कुंडगीर व इतर साथीदार यांनी मिळुन दीपक बिगानिया याचेवर पिस्तूलातून फायरिंग करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळाली.

या खात्रीशिर माहितीच्या आधारे सोमवार दिनांक 21 मार्च रोजी द्वारकादास चिखलीकर यांनी सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि सोनवणे यांनी गुप्त माहिती घेतली असता, सदर आरोपी हे बोंढार बायपास गाडेगांव रोडवर फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यावरुन स्थागुशाचे सर्व पोलीस पथकांने त्या ठिकाणी गेले असता, आरोपी हे पोलिसांना पाहुन पळ काढत होते. त्यांचा पाठलाग करुन चार आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली.

अटक केलेले ईश्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले, रा. चिखलवाडी गुरुव्दारा गेट क्र. 2, राधेश्याम ऊर्फ बजरंग अंकुशराव कुंडगीर रा. मुरमुरागल्ली, जुना मोंढा, कुलविंदरसिंघ ऊर्फ कुणाल नानकसिंघ महाजन रा. भोई गल्ली, गणपतसिंघ ऊर्फ गणु गेंदासिंघ मठवले रा. गुरुद्वारा गेट नंबर 2, चिखलवाडी, नांदेड हे मिळून आले. या संशयितांना ताब्यात घेऊन, त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता यांनी फायरिंग केले असल्याचे सांगितले. या संशयीत इसमांना तपासकामी पो.स्टे. विमानतळ यांचे ताब्यात देण्यात आले.

सदरची कामगीरी पो.नि. द्वारकादास चिखलीकर, सपोनि पांडुरंग भारती, पोउपनि सचिन सोनवणे, जसवंतसिंह शाहु, मुंडे, वडजे, अंमलदार तानाजी येळगे, मोतीराम पवार, मारोती तेलंग, गुंडेराव करले, विलास कदम, देवा चव्हाण, रुपेश दासरवाड, शंकर म्हैसनवाड, बालाजी तेलंग, बालाजी मुंडे, कलीम शेख, बजरंग बोडके, विठल शेळके, महेश बडगु, मपोना भोयर यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे प्रमोदकुमार शेवाळे यांनी कौतूक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!