Friday, November 22, 2024

सरकारी मराठी शाळांना “अच्छे दिन”; नांदेड जिल्ह्यात इंग्रजी शाळांचे 4 हजार 111 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या शाळेत

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

एकट्या हदगाव तालुक्यात हजारच्या वर विद्यार्थी जि. प. शाळेत

नांदेड– कोविड काळात विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक प्रयोग राबवून जिल्हा परिषदेने इंग्रजी शाळांमधील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळांमध्ये वळविले आहेत. जिल्ह्यात 4 हजार 111 विद्यार्थ्यांनी इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेश घेतला असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी सविता बिरगे यांनी दिली. यामुळे नांदेड जिल्ह्यातील सरकारी मराठी शाळांना काहीसे “अच्छे दिन” आल्याचे दिसून येत आहे.

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा अधिक गुणवत्तापूर्ण होतील यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षणसंस्थेचे  प्राचार्य, शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या बैठका घेऊन अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग सुरू केले आहेत. अलीकडे इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश घेण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. प्रत्येक पालकाला आपल्या पाल्याने इंग्रजी माध्यमातून शिकलं पाहिजे असे वाटू लागल्यामुळे इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थ्यांची गर्दी वाढू लागली होती. परंतु पुरेशा शिक्षित मनुष्यबळाचा अभाव आणि इतर शैक्षणिक साधन सुविधांचा अभाव यामुळे ग्रामीण भागातील इंग्रजी शाळांमध्ये विद्यार्थी रमेनासे झाले.

कोविडच्या काळात अनेक इंग्रजी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्याच धर्तीवर जिल्हा परिषदेच्या तंत्रस्नेही शिक्षकांनी  गृहभेटी, गृह अभ्यास, व्हर्च्युअल पद्धतीने शिक्षण, नाविन्यपूर्ण प्रयोग राबविल्यामुळे इंग्रजी शाळांमधून जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी आले आहेत. यात हदगाव ,मुखेड आणि लोहा तालुक्यामध्ये जास्त प्रमाणावर विद्यार्थी मराठी शाळेत प्रवेशित झाले आहेत. हदगाव 1041, मुखेड 525, लोहा 464,कंधार 341, मुदखेड 111, नायगाव 354, उमरी 288, भोकर 177, धर्माबाद 116 ,बिलोली 61, देगलूर 60, अर्धापूर 98, नांदेड 43, हिमायतनगर 325, किनवट 246, माहूर 299 असा मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांचा प्रवेश आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!