ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची प्रमुख उपस्थिती
लातूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लातूरमध्ये ७० फूट उंचीच्या भव्य ‘स्टॅचू ऑफ नॉलेज’च्या प्रतिकृतीचे अनावरण मोठ्या दिमाखदार सोहळ्यात अनावरण करण्यात आलं. माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडला.
लातूरचे भाजप खासदार सुधाकर शृंगारे यांच्या संकल्पनेतून आंबेडकरी अनुयायांच्या सहकार्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ७० फुटी उंचीची भव्य ‘स्टॅचू ऑफ नॉलेज’ ची प्रतिकृती उभारण्यात आली. ज्याचे अनावरण लातूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर पार्क इथे माजी मुख्यमंत्री, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, भाजप नेते गिरीश महाजन, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची इतकी मोठी आणि भव्य प्रतिकृती निर्माणाचा संकल्प करणाऱ्या खा. सुधाकर शृंगारे यांचे उपस्थितांनी कौतुक केले. त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे सुधाकर शृंगारे खासदार झाले आहेत, त्या खासदारांना काही अधिकारी अपमानित करत असतील तर अशा अधिकाऱ्यांना संसदेच्या चौकटीत उभं करू. तसेच याची कल्पना थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना देऊन अशा अधिकाऱ्यांवर जरब बसवू. कारण शृंगारे हे संविधानामुळे खासदार झाले असून ते कुणाच्या बापामुळे खासदार झाले नाहीत अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी अधिकाऱ्यांना ठणकावून दम भरला. मुख्यमंत्री झाल्यानंतर बाबासाहेबांची सेवा करण्याची संधी मला मिळाली. इंदू मिलवर बाबासाहेबांचे स्मारक तयार व्हावं यासाठी पंतप्रधान मोदीकडे पाठपुरावा केला. आणि मोदीनी २३०० कोटी रुपयांची जागा तीन दिवसात राज्य सरकारला हॅन्डओव्हर केली. तसेच बाबासाहेबांचे लंडन मधील घरही आमच्या सरकारने विकत घेतलं आणि तिथे म्यूजियम तयार केल्याची आठवण यावेळी फडणवीस यांनी करून दिली.
तर ‘आता आम्ही राहिलो नाही खुळे… कारण आमची प्रेरणा आहे महाडचे चवदार तळे’ या कवितेने केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणाची सुरुवात त्यांच्या खास स्टाईलमध्ये केली. खासदार सुधाकर शृंगारे याना अधिकारी कार्यक्रमाला बोलवत नसतील तर त्याच्या बदल्या करून टाकू असा ईशारा यांनी यावेळी दिला.
भाषणाच्या सुरुवातीलाच भाजप नेते तथा माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रशासनाच्या निर्णयावर टीका केली. डॉ. बाबासाहेबांची जयंती उत्साहात आणि वाजत गाजत साजरी होणारच, डीजे डॉल्बी वाजणारच. जे कांही केसेस करायच्या आहेत त्या आमच्यावर करा असा इशारा त्यांनी प्रशासनाला दिलाय. यावेळी उपस्थित भीमसैनिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ७० फुट उंचीच्या ‘स्टॅचू ऑफ नॉलेज’ च्या अनावरणासाठी यावेळी आंबेडकर प्रेमी जनतेने मोठी गर्दी केली होती. यावेळी आकर्षक लेझर शो आणि आतिषबाजीने वातावरणात मोठा उत्साह संचारला होता. ‘जय भीम’, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’ या घोषणांनी, भीम गीतांनी परिसर दणाणून गेला होता. याप्रसंगी मंचावर खा. सुधाकर शृंगारे, नांदेडचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर, माजी मंत्री आ. संभाजी पाटील निलंगेकर, माजी मंत्री गिरीश महाजन, आ. रमेश कराड, आ. अभिमन्यू पवार, माजी आ. विनायकराव पाटील, माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर, माजी आ. बब्रुवान खंदाडे, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ.टी.पी. कांबळे, माजी आ. सुधाकर भालेराव, माजी आ. पाशा पटेल, गुरुनाथ मगे, अरविंद पाटील निलंगेकर, शंकर शृंगारे, शैलेश लाहोटी, सिद्धलिंग स्वामी, भन्ते पय्यानंद, भन्ते महाथेरो, भन्ते नागसेन यांच्यासह भाजप, आरपीआय आठवले गटाचे स्थानिक नेते, पदाधिकारी कार्यकर्ते, आंबेडकरी प्रेमी जनता, नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻