ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– जमिनीतून सोने मिळाल्याचा बनाव निर्माण करून शेतकऱ्याला सोन्याचे नकली बिस्कीट देऊन फसवण्यात आल्याचा प्रकार कंधार तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी उस्माननगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कंधार तालुक्यातील चिखली येथील एका शेतकऱ्याशी ओळख करून मला जमिनीतून भरपूर सोने मिळाले आहे. पण ते सराफा दुकानात एकदाच विकता येत नाही. त्यामुळे तुम्हाला बाजार दरापेक्षा अर्ध्या किमतीत सोने देतो असे आमिष दाखवून खरे सोने म्हणून पाच तोळ्याचे नकली बिस्किट देऊन फसविण्यात आल्याचा प्रकार कंधार तालुक्यात घडला आहे. याप्रकरणी उस्माननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चिखली तालुका कंधार येथील प्रेमा गणपतराव पवळे (वय ५०) यांची पूर्णा तालुक्यातील चांगेफळ (हल्ली मुक्काम क्रांतीचौक पूर्णा) येथील करण उर्फ हनुमंत शिवाजी कांबळे (वय ४०) याने ओळख निर्माण केली. या ओळख दरम्यान त्याने मी धन पायाळू आहे. माझ्याकडे जमिनीतून मिळालेले सोने आहे, पण मला हे सोने सराफा दुकानात एकदाच विकता येत नाही. त्यामुळे मी ओळखीच्या माणसांना मार्केट रेट पेक्षा अर्ध्या किंमतीत सोने देत आहे. तुम्हालाही त्याच दरांमध्ये म्हणजे आजचा दर पन्नास हजार रुपये आहे तर तुम्हाला प्रति तोळा पंचवीस हजार रुपये प्रमाणे सोने देतो असे विश्वासात घेऊन पटवून दिले. प्रेमा पवळे हे कांबळे याच्या बोलण्यात आले आणि त्यांनी पाच तोळ्याचे सोन्याचे बिस्किट घेतले आणि त्या बदल्यात फोन पेच्या वेगवेगळ्या नंबरवर प्रेमा पवळे यांनी 99 हजार रुपये करण कांबळे यास दिले. पण खरे सोने म्हणून नकली सोने आपल्याला देण्यात आल्याचे पवळे यांना काही दिवसांनी लक्षात आले. यानंतर प्रेमा पवळे यांनी करण कांबळे त्याच्या घरी खूप खेटे घातले. परंतु त्यांने भेटण्यास टाळाटाळ करीत, मोबाइलही बंद करून टाकला.
अखेर आपली फसगत झाल्याचे लक्षात आल्यानंतर प्रेमा गणपतराव पवळे यांनी उस्माननगर पोलीस ठाणे गाठून याबाबतची तक्रार दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी करण उर्फ हनुमंत कांबळेविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहेत. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक देवकते करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻