ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– विविध सामाजिक उपक्रमातील सक्रिय व्यक्तिमत्व तथा शहरातील प्रसिद्ध उद्योगपती निलेश ठक्कर (वय ५६) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी दुपारी ३.४५ वा. मुंबई येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.
निलेश ठक्कर हे नांदेड जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योगपती होते. गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या पारंपरिक व्यवसायाची धुरा खंबीरपणे सांभाळत होते. नांदेड शहरातील भव्य ट्रेझर मॉलची सुरुवात करून नांदेड शहराच्या वैभवात त्यांनी भर टाकली. शहरातील ‘ठक्कर अँड सन्स’चे ते मालक होते. त्यांना शहरातील नांदेड आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आले होते. शहराच्या विकासात आपले योगदान राहावे, असा त्यांचा सतत प्रयत्न राहिला आहे. शहरातील नामवंत डॉक्टर्स, वकिल, पत्रकार, उद्योजक, अनेक लोकप्रतिनिधींशी त्यांचे सलोख्याचे संबंध होते. निलेश ठक्कर यांच्या निधनाची वार्ता कळताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. गुरुवारी दि. १६ जून रोजी सकाळी गोवर्धनघाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
काही दिवसांपूर्वीच त्यांना अल्पशा आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नांदेड येथील उपचारानंतर मुंबई येथे हलवण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचे बुधवारी दुपारी ३.४५ वा. निधन झाले.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻