ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – एका शाळेतून नांदेडकडे विद्यार्थ्यांना घेऊन येणाऱ्या एका स्कूल बसला आग लागली. चालकाने सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या बाजूला उभी करून विद्यार्थ्यांना गाडीखाली उतरवले. त्यानंतर ही आग विझविण्यात आली. अग्निशमन दलाचा बंब तात्काळ घटनास्थळी दाखल झाला. सुदैवानं आगीमध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाही. विशेष म्हणजे बसमध्ये २० विद्यार्थी होते.
शनिवार दि.२५ जून रोजी संध्याकाळी सहाच्या सुमारास पुर्णा रोड भवानी चौक जवळ (MH 24- J 7239) या स्कूल बसला आग लागली. महापालिकेचे अग्निशमन दल तात्काळ अग्निशमन वाहनासह घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी ही आग विझवली. ज्ञानभारती विद्यालय या शाळेची ही बस होती. बसमध्ये २० मुले, वाहन चालक व त्यांचे सहकारी होते. सर्व मुलांना तात्काळ सुखरूप बाहेर काढण्यात आले.
बसमधील बॅटरीमध्ये शॉर्टसर्कीट होऊन आग लागली असल्याचे सांगण्यात आले. अग्निशमन दलाने ततात्काळ घटनास्थळी येऊन ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जिवीतहानी झाली नाही.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻