ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शिवसेनेचेबंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निवासस्थानावर काल शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यांचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न शिवसैनिकांचा प्रयत्न होता. त्यानंतर आता केंद्र सरकारने आ. कल्याणकर यांच्या घराला केंद्रीय सुरक्षा एजन्सीची सीआरपीएफ सुरक्षा दिली आहे. सीआरपीएफ अनेक जवान आणि एक अधिकारी असा कडक बंदोबस्त याठिकाणी आता लावण्यात आला आहे.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांविरोधात शिवसेना प्रचंड आक्रमक झाली असून राज्यात अनेक ठिकाणी तोडफोडीचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी केंद्रातील भाजप सरकार मोठे पाऊल उचलले आहे. बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांना आता केंद्र सरकारने सुरक्षा देण्याचा निर्णय घेत तात्काळ ही सुरक्षा तैनातही केली आहे.
शिवसेनेचे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्याही कार्यालयासमोर काल शनिवारी जिल्हा शिवसेनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. त्यानंतर त्यांचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र नांदेड पोलिसांनी वेळीच बंदोबस्त लावल्याने कार्यकर्त्यांना संपर्क कार्यालय फोडता आले नाही. यानंतर आता आमदार बालाजी कल्याणकर यांच्या कार्यालयाला सीआरपीएफच्या जवानांचा बंदोबस्त देण्यात आलेला आहे. या ठिकाणी 6 जवान आणि एक अधिकारी असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सोबतच नांदेड भाग्यनगर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर आडे व त्यांचे पथकही बंदोबस्तावर आहे.
शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी आमच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा आरोप काल केला हेाता, मात्र, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सुरक्षा कमी केल्याचा इन्कार करत कोणाचीही सुरक्षा कमी करण्यात आली नाही, असे स्पष्ट केले होते. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बंडखोर शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांना सुरक्षा पुरविण्याचा हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील ज्या आमदार, मंत्र्यांचे कुटुंबीय मागणी करतील, त्यांना सुरक्षा देण्यात येणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्रालयाकडू स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेनेकडून राज्यात ठिकठिकाणी होणाऱ्या आंदोलनामुळे केंद्र सरकारने हे पाऊल उचलले आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांच्या घराची सुरक्षा व्यवस्थाही काढून घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीत कुटुंबियांच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारची असल्याचे म्हटले होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻