ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या 265 अहवालापैकी आरटीपीसीआर तपासणीद्वारे नांदेड मनपा 13, नांदेड ग्रामीण 1, कंधार 1 तर ॲटीजन तपासणीद्वारे नांदेड मनपा 3 असे एकूण 18 अहवाल कोरोना बाधित आले आहेत. जिल्ह्यात आजवर एकुण बाधितांची संख्या 1 लाख 2 हजार 884 एवढी झाली असून यातील 1 लाख 153 रुग्णांना उपचारानंतर बरे झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आलेली आहे. आजच्या घडीला 39 रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत बाधित मृत रुग्णांची संख्या 2 हजार 692 एवढी आहे. नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 3 रुग्णाला उपचारानंतर बरे झाल्याने सुट्टी देण्यात आली. नांदेड जिल्ह्यातील तालुक्याअंतर्गत गृह विलगीकरण 3, नांदेड मनपा अंतर्गत गृहविलगीकरणातील 33, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी 3 असे एकुण 39 व्यक्ती उपचार घेत आहेत.
जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सेवाभावी संस्था, प्रतिनिधी आणि जागरुक नागरिकांनी आरोग्य जागराच्या चळवळीत सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.
आतापर्यंतची जिल्ह्याची कोरोना संशयित व कोविड बाधितांची संक्षिप्त माहिती
एकुण घेतलेले स्वॅब- 9 लाख 7 हजार 799
एकुण निगेटिव्ह स्वॅब- 7 लाख 87 हजार 592
एकुण पॉझिटिव्ह बाधित व्यक्ती- 1 लाख 2 हजार884
एकूण रुग्णालयातून सुट्टी दिलेली संख्या- 1 लाख 153
एकुण मृत्यू संख्या-2 हजार 692
उपचारानंतर बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.34 टक्के
आज स्वॅब तपासणी अनिर्णीत संख्या-2
आज स्वॅब नाकारण्यात आलेली संख्या-4
आज प्रलंबित स्वॅब तपासणी संख्या-निरंक
रुग्णालयात उपचार घेत असलेले बाधित व्यक्ती-39
आज रोजी अतिगंभीर प्रकृती असलेले-निरंक.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻