Saturday, December 21, 2024

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्थगित; १०७ उमेदवारांनी दाखल केले होते उमेदवारी अर्ज

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ निवडणूक स्थगित झाल्यामुळे कहीं खुशी कहीं गम

अर्धापूर (जि. नांदेड)– माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक स्थगित करण्यात आली आहे. या साखर कारखाना निवडणुकीच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी १०७ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

राज्यातील पूर परिस्थितीमुळे व हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे सध्या सुरू असलेल्या सहकारी संस्थेच्या निवडणुका ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात येत असल्याचे परिपत्रक सहकार पणन व वस्त्र उद्योग विभागाच्यावतीने काढण्यात आले आहे. त्यामुळे अशोक चव्हाण यांच्या अधिपत्याखालील अर्धापूर तालुक्यातील भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना निवडणुकही स्थगित झाली आहे. भाऊराव कारखाना निवडणुकीसाठी शेवटच्या दिवशी १०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सहकार विभागाच्या परिपत्रकामुळे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.

राज्य आपत्ती व्यवस्थाप प्राधिकरणच्या अहवालानुसार राज्यातील बहुतांश भागात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील जनजीवन तसेच वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. त्याचप्रमाणे भारतीय हवामान खात्याकडून आय एम डी अतिवृष्टीचा इशारा दिल्यामुळे राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांच्यावतीने पत्र १३ जुलै रोजी काढण्यात आले आहे. त्यानंतर भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती आज निवडणूक अधिकाऱ्यांच्यावतीने देण्यात आली आहे. निवडणूक विभागाच्या वतीने क्र. सनित ०७२०/प्र.क्र.१४३/१३स.सहकार,पणन व वस्त्रोद्योग विभाग मंत्रालय मुंबई अधिकारी महाराष्ट्र शासन अनिल चौधरी यांना काढले आहे. त्यामुळे यांचे पत्र  दि. १५ शुक्रवारी रोजी  काढण्यात आल्यामुळे निवडणूक रद्द करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी लतिफ पठाण,सहाय्यक पिंटू सपकाळ यांनी दिली आहे.

भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी आ. सौ.अमिताताई चव्हाण यांच्यासह १०७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. सहकार विभागाच्या परिपत्रकामुळे भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सहकार विभागाने कळविले आहे. ही निवडणूक रद्द झाल्यामुळे ‘कहीं खुशी कहीं गम’चे वातावरण आहे. या निवडणुकीत अनेक अटी व शर्तीमुळे अनेक उमेदवार निवडणुकीतून बाद झाले होते. त्यातच भाजप, प्रहारने शासनाकडे ज्या शेतकऱ्यांच्या नावावर सातबारा आहे अशा सर्व शेतकऱ्यांना निवडणुकीत मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!