Saturday, December 21, 2024

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात झाला बदल, उद्या सकाळी नांदेडमध्ये येणार; काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- खासदार हेमंत पाटील यांनी केले आवाहन

नांदेड- राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नांदेड दौऱ्यात बदल झाला असून आज रविवार ऐवजी ते उद्या सोमवारी सकाळी नांदेडमध्ये येत आहेत. त्यांचा सुधारित दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 

सोमवार 8 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 11.15 वाजता मुंबई येथून विमानाने श्री गुरुगोविंद सिंगजी विमानतळ नांदेड येथे आगमन व मोटारीने गुरूद्वाराकडे प्रयाण. सकाळी 11.30 ते 11.50 वाजेपर्यंत हुजूर साहिब गुरुद्वारा नांदेड येथे राखीव. दुपारी 12 ते 12.30 वाजेपर्यंत गोदावरी अर्बन बँकेस भेट. (संदर्भ खासदार हेमंत पाटील). दुपारी 12.40 ते 1.15 वाजेपर्यंत नांदेड उत्तर मतदारसंघातील पूरग्रस्त बाधित भागाची पाहणी. दुपारी 1.15 ते 1.45 वाजेपर्यंत भक्ती लॉन्स नांदेड येथील मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.45 ते 2.30 वाजेपर्यंत शासकीय विश्रामगृह नांदेड येथे राखीव.

दुपारी 2.30 वा. नांदेड येथून मोटारीने हिंगोलीकडे प्रयाण. रात्री 8.30 वा. हिंगोली येथून नांदेड विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण करतील.

सुधारित दौरा 👇🏻

नांदेड, हिंगोली जिल्ह्यातील शिवसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे- खासदार हेमंत पाटील यांचे आवाहन

राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोमवारी (दि.आठ) नांदेड आणि हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी मुख्यमंत्री करणार आहेत. सोबतच दोन्ही जिल्ह्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन देखील करणार आहेत सोबतच कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनी उपस्थित राहावे, असे आवाहन हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेड येथील विमानतळावर आगमन होणार आहे. त्यानंतर ते सचखंड श्री हूजूर साहेब गुरुद्वाऱ्यात जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर तरोडा नाका भागातील गोदावरी अर्बन सहकारी संस्थेच्या सहकारसूर्य या मुख्यालयास भेट देणार आहेत. नांदेड उत्तर चे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या प्रयत्नांने सुरू असलेल्या निळारोड (गुरुजी चौक) येथे एका विकास कामाचे भूमिपूजन, पासदगाव आसना नदीवरील पुलाचे भूमिपूजन अश्या विविध विकास कामाचे भूमिपूजन मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते होणार आहे तसेच  नांदुसा येथील पुराच्या पाण्याने नुकसान झालेल्या शेती पिकांची पाहणी करण्यासोबतच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना दिलासा देणार आहेत. त्यानंतर भक्ती लॉन्स येथे होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्यास मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार आहेत.

नांदेड जिल्ह्यातील कार्यक्रम आटोपुन मुख्यमंत्र्यांचा ताफा आसनामार्गे अर्धापूर, वारंगा, बाळापूर, कळमनुरी, हिंगोली येथे पदार्पण करणार आहेत. हिंगोली येथे आमदार संतोष बांगर यांनी आयोजित केलेल्या कावड यात्रेत मुख्यमंत्री सहभागी होणार असून, त्यानंतर कार्यकर्ता मेळाव्यास मार्गदर्शन करणार आहेत. पुढे लिंबाळामार्गे औंढा (ना.) येथील औंढा नागनाथ देवस्थानचे दर्शन घेऊन मालेगाव मार्गे पुन्हा नांदेडकडे परतणार आहेत. नांदेडहून विमानाने मुंबईकडे रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नांदेड – हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. विकासाच्या बाबतीत नेहमी पुढाकार घेणारे एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यामुळे सामान्य नागरिकांच्या आशा उंचावल्या आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा दौरा सर्वांसाठी ऊर्जा देणारा असा अविस्मरणीय ठरणारा आहे. तेव्हा जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री यांच्या स्वागतासाठी उपस्थित राहावे, असे आवाहन खासदार हेमंत पाटील, नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांनी केले आहे.

नांदेड–हिंगोली जिल्ह्याचा रखडलेला विकास पुन्हा झपाट्याने सुरु होईल- खासदार हेमंत पाटील
मुळात एकनाथ शिंदे हे एक सामान्य लढाऊ कार्यकर्ता म्हणून नावारुपाला आलेलं उद्योन्मुख नेतृत्व आहे. आजपर्यंत त्यांनी विकास कामास प्राधान्य दिले आहे. आज ते राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याने पहिल्यांदा त्यांनी हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यात हिंदुहृदयसम्राट स्व.बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रक्रिया केंद्रास 100 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. आहेत. त्यामुळे नांदेड व हिंगोली जिल्ह्यातील रखडलेले विकास कामे पुन्हा वेगाने सुरु झाल्याने हिंगोली, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सर्वसामन्यांच्या आशा उंचावल्या आहेत, अशी प्रतिक्रिया खासदार हेमंत पाटील यांनी व्यक्त केली आहे.

काँग्रेसचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

जिल्ह्यातील विविध विकासाच्या प्रश्नांसदर्भात माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सूचनेनुसार काँग्रेसचे शिष्टमंडळ सोमवारी (दि. ८) नांदेड दाैऱ्यावर येणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून विविध मागण्यांचे निवेदन त्यांना देण्यात येणार आहे.

नांदेड जिल्ह्यात गेल्या महिन्यात झालेल्या पूरपरिस्थितीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. या हानीची माहिती देऊन शेतकऱ्यांना मदत करावी तसेच शहरासह जिल्ह्यातील मंजूर झालेल्या विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी हे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. शिष्टमंडळात जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाचे सर्व आजी, माजी लोकप्रतिनिधी तसेच शहर आणि जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश असणार आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!