Thursday, December 5, 2024

राज्यभर गाजलेल्या टीईटी घोटाळ्यात नांदेड जिल्ह्यातील ५४ शिक्षकांचा समावेश; अपात्रतेची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड (प्रल्हाद कांबळे)- सबंध राज्यभर टीईटी परीक्षा (शिक्षक भरती) घोटाळा उघड झाल्यानंतर शिक्षण संचालक कार्यालयाने कारवाई करत सात हजार ८७४ शिक्षकांना अपात्र करत त्यांचे वेतन रद्द करण्याचे आदेश दिले. या अपात्रतेमध्ये नांदेड जिल्ह्यातील 54 शिक्षकांचा समावेश आहे.

राज्यातील अनेक जिल्ह्यात टीईटी घोटाळ्यातील शिक्षकांवर कारवाई होत असतांना लातूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मात्र अपात्र शिक्षकांची यादी दिली जात नसल्याचा आरोप झाल्यानंतर बुधवारी रात्री उशिरा अपात्र शिक्षकांची यादी जाहीर केली. एवढेच नाही तर शिक्षणाधिकार्यांना अपात्र शिक्षकांची यादी देण्यास मज्जाव करण्यात आला होता.

टीईटी घोटाळ्यातील सात हजार ८७४ शिक्षकांना अपात्र करण्यात आल्यानंतर ऑगस्टपासून वेतन बंद करण्याचे आदेश पुणे येथील शिक्षण संचालकांनी दिले होते. त्यानुसार बहुतांश जिल्ह्यात शिक्षकांचे ऑगस्ट महिण्यापासूनचे वेतन बंद करण्यात आले आहे.

लातूर येथील शिक्षण उपसंचालक यांच्याकडे लातूर, नांदेड व उस्मानाबाद जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांच्या याद्या होत्या. एकीकडे शिक्षण संचालक टीईटी घोटाळ्यातील अपात्र शिक्षकांवर कार्यवाही करत सात हजार ८७४ शिक्षकांची यादी प्रसिध्द केली. ही यादी समाज माध्यमावर प्रसारीत झाली. परंतु शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून नांदेड जिल्ह्यातील अपात्र शिक्षकांची यादी दिली जात नसल्याने शिक्षण उपसंचालक कार्यालयासह शिक्षण विभागातील अधिकार्यांवर संशय व्यक्त केला जात होता. अखेर ही यादी  लातूर विभागाचे शिक्षण उपसंचालक डॉ. गणपत मोरे यांनी आपल्या स्वाक्षरीची जाहीर केली.

नांदेड जिल्ह्यातील अपात्र ठरलेले शिक्षक पुढीलप्रमाणे:

एकता उर्दू प्राथमिक शाळा अर्धापूर मोहम्मद फराज गुलाम मोईनोद्दीन, श्री छत्रपती शिवाजी जुनिअर बेसिक स्कूल सगरोळी श्याम अर्जुनराव भोसले, ताराबाई किशन सिद्धापुरे, साधना प्रायमरी स्कूल देगलूर संगीता नीलकंठराव सुभेदार, उर्दू प्रायमरी स्कूल धर्माबाद सय्यद साजिद हुसेन, लेट ऑल उर्दू प्रार्थमिक शाळा इस्लामपुर किनवट शेख अहमद पाशा शेख इस्माईल नबी, गुरुदेव विद्यामंदिर प्राथमिक शाळा मुदखेड गंगाराम अविनाश पानपट्टे, दैवशाला भारतराव कळसकर, पवन मारुतीराव मानेकर, शंकरराव चव्हाण प्राथमिक शाळा मुखेड स्नेहल रमाकांत परकंठे, वसंत गोविंदराव खंदारे, जनसेवा बालक मंदिर प्रायमरी स्कूल मुखेड रणजीत व्यंकटराव डांगे, विठ्ठल दगडोबा चव्हाण, राहुल वसंतराव कोंडलवाडे, सी. पी. एस. हिप्परगा बालाजी भाऊराव ढुमणे, फैजल उलूम नांदेड समरीन बेगम शेख इसुफ, आयेशा परवीन अब्दुल सत्तार, मदरसे अमिना गर्ल स्कूल मेहबूबनगर नांदेड महेनाज इरम अजिज सिद्दिकी, नोबल प्राथमिक शाळा लेबर कॉलनी नांदेड नाझिया बेगम अश्फाक हुसेन, फौजीया मिनहाज अफजल अहमद खान, मतीन खन्नम, श्री निकेतन पंचायत प्राथमिक शाळा दीपकनगर नांदेड श्रीधर नामदेवराव पवार, मदरसे मिलाई उर्दू प्रार्थमिक शाळा हैदरबाग नंबर दोन नांदेड मिरज फातिमा अली चाऊस, एकता प्राथमिक शाळा उर्दू/ मराठी नंदिग्राम सोसायटी नांदेड मोहम्मद तसलीम मोहम्मद इब्राहिम, शेख हिना मोहम्मद रफी, आदर्श विद्यालय टिळकनगर नांदेड सुप्रिया सुभाष वन्नाळे, राहुल गोमाजी पवार, अविनाश नागोराव खंदारे, युसुफिया प्राथमिक शाळा पीरबुर्हाननगर सय्यद नसरुद्दीन सय्यद इसुफ‌अली, इस्लाहुल अमल प्राथमिक शाळा सयदान नांदेड अब्दुल्ला सौद बशीर, अब्दुल रब अब्दुल हबीब, अब्बासी मोहम्मद जुबेर, नेहा अफ्रीन मोहम्मद अफसर, सोबिया नजनीम मोहम्मद रफी, अमरा मरयम्म, मोहम्मद इस्माईल अब्दुल रजाक, महवीन फातेमा मिर्झा कलीम बेग, मदरसे कुरेशिया उर्दू प्राथमिक शाळा मनियार गल्ली नांदेड सुमया फिरदोस शेख अहमद, महमद हाजी मोहम्मद फारूक, नानक विद्यामंदिर शिवनगर नांदेड मयुरी गणपतगौड सुदनवार, सय्यद फारुख पाशा उर्दू प्राथमिक शाळा देगलूर नाका नांदेड फौजिया कौसर मोहम्मद हबीब, माजिद खान हमीद खान, अब्दुल माजीद उल जवाद अब्दुल मुजीब, उर्दू प्रार्थमिक शाळा चौफाळा नांदेड मोहम्मद जावेद अब्दुल हमीद, गुलशन उर्दू प्रार्थमिक शाळा नांदेड इमरान अफ्रीन, निजामूल उलुम उर्दू प्राथमिक शाळा खुशरोनगर नांदेड खालेद गौस मयुद्दीन काजी, वसीम सुलताना मुख्तार अहमद, हजरत उमर फारुख उर्दू प्रार्थमिक शाळा मिल्लतनगर नांदेड इस्लाम मोहंमद याकुब मो. इब्राहिम, ईसलाहुल अमल प्रार्थमिक शाळा एमआयडीसी सिडको नांदेड अतीक‌उर रहेमान, नरसिंह विद्यामंदिर प्राथमिक शाळा सिडको गंगाराम तुकाराम बासवडे, सफा उर्दू प्रार्थमिक शाळा वजिराबाद रजिया अंजुम समीर खान, सौदागर उर्दू प्रार्थमिक शाळा बिलालनगर नांदेड अब्दुल माजीद अब्दुल गनी, मोहम्मद सलीम यांचा समावेश आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!