ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ एक लाख 87 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा
नांदेड- अवैधपणे दारू विकणाऱ्या शहरातील ढाबा मालकांसह पिणाऱ्यांनाही दणका बसला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध दारू विकणाऱ्या ढाब्यावर धाड टाकत अवैध दारू विकणाऱ्या ढाबा मालकांसह तिथे दारू पिणाऱ्या 29 जणांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने एक लाख 87 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली आहे.
येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांनी नांदेड परिसरातील चार धाब्यावर कारवाई केली. या कारवाईदरम्यान त्यांनी 25 मद्यपींना अटक केली. या मद्यपींसह ढाबा चालक, मालकांना न्यायालयाने एक लाख 87 हजार रुपयांचा दंडाची शिक्षा सुनावली. धाड आणि अटकेची ही कारवाई 25 सप्टेंबर रोजी करण्यात आली होती.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे विभागीय उपायुक्त प्रदीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेडचे अधीक्षक अतुल कानडे यांनी आपल्या पथकाद्वारे जिल्ह्यातील विनापरवाना मद्य विक्री करणाऱ्या ढाब्यांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर या पथकांनी नांदेड शहरातील नमस्कार चौक येथील हॉटेल शिवांश ढाबा, तुळजाई ढाबा, नमस्कार ढाबा, अंबाई ढाबा येथे धाड टाकत ही कारवाई केली. या धाब्यावर ग्राहकांना शासनमान्य अनुज्ञप्ती मद्य सेवनास परवानगी नसताना त्यांनी परवानगी दिल्याचे आढळून आले. यावरून उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने संयुक्त मोहिम राबवून संबंधित ढाबे आणि हॉटेलवर दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून विनापरवाना मद्यपी मद्य पीत बसलेले 25 ग्राहक व चार ढाबा मालक आणि चालक असे 29 जणांना अटक केली.
26 सप्टेंबर रोजी गुन्ह्याच्या मूळ दोषारोपात्रासह प्रथमवर्ग न्यायालय नांदेड येथे यांना हजर केले असता एका ढाबा मालकास 70 हजार रुपये तर उर्वरित तीन धाबा मालकांना प्रत्येकी 35 हजार रुपये व 25 मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी पाचशे रुपये असे एकूण एक लाख 87 हजार रुपये रकमेची दंडाची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. यावेळी मनोज देशमुख ढाबा चालक राहणार बारड तालुका मुदखेड हल्ली मुक्काम नमस्कार चौक नांदेड, सुरेश लक्ष्मण सोनटक्के राहणार बारड, बाबुराव गंगाराम बडवे राहणार मगनपुरा नांदेड, अजय विनायक राठोड राहणार भावसार चौक, मंगेश नामदेवराव बागडे नमस्कार चौक, बाळू देवराव शिंदे धाबा मालक राहणार मेहबूबनगर नांदेड, संतोष विलास पाटील वसंत नगर, विलास नरहरी पावडे विजयनगर, सुरेश तुकाराम भोस ताजजयनगर, शुभम दिगंबर पांडे जवाहरनगर तुप्पा, वैजनाथ माधव रोंधळे गोविंद नगर, रजनीश उत्तम खंदारे कर्मवीर नगर, सुरेश शिवाजी नागेश्वर विष्णुनगर, सुधीर दिगंबर भिसे विश्वकर्मा कॉलनी नांदेड, भुमन्ना नागोजीराव आक्केमवाड ढाबा चालक राहणार विष्णुनगर, आनंद नारायण तळणीकर रा. तळणी, सचिन सोपानराव पावडे पुयणी, नवनाथ बालाजी जाधव बाबानगर, रघुनाथ व्यंकटी पाटील रातोळी तालुका नायगाव, नरसिंह शहदत्त जंगीलवाड जामगाव, पांडुरंग सुभाषराव राजेगोरे पासदगाव, गजानन शारंगधर उसळकर राहणार सातगाव, सचिन तुकाराम जाधव राहणार पासदगाव, यशवंत मरीबा इंगोले ढाबा चालक राहणार पौर्णिमानगर, विलास नामदेव कराळे, संजय पायनापल्ले, कैलास रामराव राजेगोरे शेलगाव, गुरुप्रसाद सिंह सरदार सिंह चव्हाण शक्तिनगर, अजयसिंह अवतार सिंह चव्हाण महाराणा प्रताप चौक यांचा समावेश आहे.
ही कारवाई अधीक्षक अतुल कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक एम. ए. शेख, ए. एम. पठाण, एम. एम. बोदमवाड, बी. व्ही. हिप्परगेकर, ए. बी. चौधरी, दुय्यम निरीक्षक एच. एम. पाकलवाड, व्ही. व्ही. फुलारी, एस. व्ही. वाघमारे, ए. एन. पीकले, आर, डी. सोनवणे, एस. टी. कुबडे, जे. एक. गुट्टे, बी. बी. ईथ्थर व भरारी पथकाचे सहायक निरीक्षक, जवान बालाजी पवार, वाहन चालक यांचा सहभाग होता.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻