Thursday, November 21, 2024

मोठ-मोठे ट्रकच करायचे गायब! स्थानिक गुन्हे शाखेने केली टोळीला अटक, 5 ट्रक जप्त

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ 5 हायवा, टिप्परसह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त, 7 गुन्हे उघडकीस

नांदेड- मोठ-मोठ्या ट्रक चोरी करणाऱ्या एका टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. त्यांच्याकडून 5 हायवा व टिप्परसह एक कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण 7 गुन्हे उघडकीस आले आहेत.

माली गुन्ह्यातील गुन्हेगारांना अटक करण्याबाबतच्या सुचना पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक, स्थागुशा, नांदेड यांनी वेगवेगळी पथके तयार करुन मालाविषयीचे गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेणे सुरु केले होते.

मागील एक वर्षामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये 7 हायवा टिपर चोरीच्या घटना घडल्या होत्या. सदर हायवा टिपर चोरांच्या टोळीचा शोध घेणे सुरु होते. दि. 25 डिसेंबर रोजी व्दारकादास चिखलीकर यांना गुप्त बातमीदाराकडून खात्रीशीर माहीती मिळाली की, नांदेड जिल्ह्यातील तसेच हिंगोली जिल्ह्यातील हायवा टिपर चोरी करणारा एक व्यक्ती हा वांगी ता. जि. नांदेड येथे असल्याबाबत खात्रीशीर माहीती मिळाल्याने त्यांनी तशी माहीती पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना दिली.  द्वारकादास चिखलीकर यांना कार्यवाही करण्याबाबत त्यांनी आदेशीत केले.

स्थागुशाचे पोलीस निरीक्षक यांनी अधिकारी व अमंलदाराना घेवून वांगी येथे जावून सापळा रचुन आरोपी लखन अवधुत जाधव (वय 22 वर्ष रा. वांगी ता. जि. नांदेड) यास पकडून विचारपुस केली असता त्याने व त्याच्या सोबत जनार्धन ऊर्फ गजानन काळे रा. जालना, मेहराज सय्यद रा. औरंगाबाद, विष्णु आखात रा. जालना प्रभु बामणे रा. जालना, लक्ष्मण गाडे रा. पाचोड जि. औरंगाबाद, हरी मखमले रा. जालना यांनी मिळुन नांदेड जिल्ह्यातील सहा व हिंगोली जिल्ह्यातील एक हायवा टिपर चोरी केले असल्याचे सांगितले. नमुद टोळीतील चोरट्यांचा शोध घेतला असता जनार्धन ऊर्फ गजानन काळे रा. जालना, मेहराज सय्यद रा. औरंगाबाद हे मिळुन आले.

चोरी केलेल्या हायवा टिपरपैकी लखन जाधव याच्याकडुन एक, मेहराज सयद याचेकडुन दोन हायवा टिपर व जनार्धन ऊर्फ गजानन काळे याच्याकडुन तोडलेल्या स्थितीतील दोन हायवा टिपरचे सुटे भाग असे एकुण पाच हायवा टिपर तसेच चोरीचा गुन्हा करताना वापरलेली स्कॉर्पिओ जिप असा एकुण 1,02,00,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे. नमुद टोळीतील इतर आरोपीचा शोध घेणे चालु असून नमुद टोळीकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. मिळून आलेल्या आरोपीना पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं, 1505/2022 कलम 379 भादवी गुन्ह्यात तपासकामी देण्यात आले आहे.

नमुद आरोपीतांकडुन 1) पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण गुरनं. 505/2022 कलम 379 भादवि 2) पो स्टे नांदेड ग्रामीण गुरनं. 314/2022 कलम 379 भा द वि 3) पो स्टे हदगांव गुरनं. 291/2022 कलम 379 भा द वि 4) पो स्टे रामतीर्थ गुरनं. 189/2022 कलम 379 भा द वि 5) पो स्टे देगलुर गुरनं. 545/2022 कलम 379 भादवि 6) पो स्टे उस्माननगर गुरनं. 190/2022 कलम 379 भा द वि 7) पो स्टे वसमत जि. हिंगोली गुरनं. 285/2022 कलम 379 भादवी असे गुन्हे उघडकीस आले आहेत.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर , सपोनि पांडुरंग माने, पोउपनि सचिन सोनवणे, सपोउपनि संजय केंद्रे, पोहेकॉ गंगाधर कदम, पो कॉ देवा चव्हाण, तानाजी येळगे, मोतीराम पवार, रणधीर राजबन्सी, बजरंग बोडके, चापोकॉ अर्जुन शिंदे, शेख कलीम यांनी पार पाडली आहे. सदर पथकाचे पोलीस अधीक्षक नांदेड यांनी कौतुक केले आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!