ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पुन्हा एकदा, दातार चौक परिसरात रस्त्यावर हातात बंदूक घेऊन दहशत पसरवणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. शेख इमरान शेख गौस ( वय २०) असे बंदूक बाळगणाऱ्या आरोपीचे नाव आहे.
शहराच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दातार चौक परिसरातील भाजी मंडई येथील शेख इमरान शेख गौस (वय 20) हा युवक बुधवार दि.10 जानेवारीच्या सायंकाळी पाचच्या सुमारास बिना परवाना बेकायदेशीररित्या आपल्या हातात बंदूक (छऱ्याची) घेऊन रस्त्यावरून येणाऱ्या- जाणाऱ्या लोकांमध्ये दहशत पसरत होता. ही माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे गस्तवर असलेले पोलीस हवालदार अफजल पठाण यांना मिळाली. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन हातात बंदूक बाळगणाऱ्या शेख इमरान शेख गौस याला अटक केली. त्याच्याकडून बंदूक जप्त करण्यात आली आहे.
याप्रकरणी अफजल पठाण यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री गायकवाड करत आहेत. या कारवाईत शिवाजीनगर गुन्हे शोध पथकाचे फौजदार मिलिंद सोनकांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनीही मदत केली.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻