ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड)- भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कारने आधी आयचर टेम्पोला आणि त्यानंतर दुसऱ्या एका कारला धडक दिल्याने टेम्पो चालकासह दोन जण जागीच ठार झाले. तर सहा जण गंभीर जखमी झाले असून जखमीवर नांदेडच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. महामार्ग पोलिसांनी जखमींना तात्काळ नांदेडच्या खासगी रुग्णालयात दाखल केले.
कार (एमएच- ३७- जी- 9889) ही कार नांदेडकडे येत असताना भरधाव वेगातील ही कार अर्धापूर ते नांदेड रस्त्यावर असलेल्या प्रसाद ब्रिस्टल पोल कारखान्यासमोर सर्वात अगोदर दुभाजकावर धडकली. त्यानंतर ही कार समोर असलेल्या आईचरला धडक बसली. त्यानंतर या कारने पुन्हा कार क्रमांक (एमएच- २३- एडी- 3567) या कारलाही जोरदार धडक दिली. या अपघातात आयचर क्रमांक (एमएच- १३- सीयु- 4244) चा चालक रामा प्रल्हाद डोंगरे (वय 50) राहणार इंचेगाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर आणि अमित विठ्ठल घुगे (वय 29) राहणार गीतानगर नांदेड हे दोघेजण जागीच ठार झाले.
तर या अपघातात स्वप्निल पाटील, अभिजीत शिरफुले, साईनाथ मुळे सर्व नाईकनगर नांदेड आणि नजमा बेगम, सय्यद अहमद, नावीद बेगम, जैनब सय्यद, सय्यद आयान सर्व राहणार बरकतपुरा माळ टेकडी नांदेड हे जखमी झाले आहेत. महामार्ग पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण यांनी आपल्या पथकासह रात्री घटनास्थळी धाव घेतली. अडकलेल्या वाहनातून जखमींना बाहेर काढुन त्यांना तात्काळ रुग्णवाहिकेद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातामुळे या रस्त्यावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻