ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी एकतर्फी विजय मिळविला आहे. महाविकास आघाडीचे १७ उमेदवार विजय झाले तर हमाल मापाडी मतदारसंघातून अपक्ष उमेदवार निवडून आला आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ही निवडणुकीत प्रतिष्ठेची केली होती. अखेर या बाजार समितीवर त्यांनी पुन्हा वर्चस्व निर्माण केले आहे.
दि. ३० रविवारी रोजी सकाळी ८ वाजता आयटीआय सभागृहात १२ टेबलवर मतमोजणी पूर्ण करण्यात आली. या निवडणुकीत महाविकास आघाडीचा एक उमेदवार यापूर्वीच निवडून आलेला आहे. उर्वरित १६ जागांसाठी झालेल्या निवडणूकीत १५ महाविकास आघाडीचे तर १ अपक्ष उमेदवार विजयी झाला असल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी अनिल चव्हाण यांनी दिली. नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीवर पुन्हा माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. भाजपला एकही जागा मिळू शकली नाही.
नांदेड कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत ४३ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात होते. कृऊबा समितीच्या निवडणुकीत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या महाविकास आघाडीच्या पॅनलच्या १७ जागा निवडून आल्या आहेत. तर कृऊबास मध्ये परिवर्तन घडविण्यासाठी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, खा. हेमंत पाटील, आ. बालाजी कल्याणकर यांच्या नेतृत्वाखाली युतीचे परिवर्तन पॅनला एकही जागा जिंकता आली नाही. ही निवडणूक एकतर्फी होऊन महाविकास आघाडीचे १७ उमेदवार निवडून आले आहेत.
महाविकास आघाडी पॅनल विजयी करण्यासाठी माजी मंत्री डी. पी. सावंत, माजी खा. भास्करराव खतगावकर, माजी आ. अमरनाथ राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू पाटील, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, बबनराव बारसे, माधव पावडे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हरिहरराव भोसीकर यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी मेहनत घेत महाविकास आघाडीचे १७ उमेदवार निवडून आणण्यात हातभार लावला.
निवडणुकीत विजयी उमेदवार: माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, संजय देशमुख लहानकर, श्यामराव टेकाळे, भगवानराव आलेगावकर, भुजंग पाटील, पत्रकार निळकंठ मदने, ज्ञानेश्वर राजेगोरे, गांधी पवार, निलेश देशमुख, नागोराव आढाव, सत्यजित भोसले, सदाशिव देशमुख, गायत्रीबाई कदम, कमलबाई वाघ, गंगाधर शिंदे, नाना पोहरे हे निवडून आले तर हमाल मापाडी मतदारसंघातून शिवाजी दराडे हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख बबनराव बारसे बिनविरोध निवडून आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयी झाल्याचे घोषित होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्तांनी जल्लोष केला. विजयी उमेदवारांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांची भेट घेऊन जल्लोष साजरा केला.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
🙏