ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- नायगाव तालुक्यातील नावंदी येथे राहणाऱ्या एका युवकाने आपल्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवून देण्याची दिली होती. या गंभीर प्रकरणाचा शोध घेऊन मुंबई पोलीस आणि नांदेड ‘एटीएस’ अर्थात दहशतवाद विरोधी पथकाने नायगाव तालुक्यातील नावंदी येथील युवकाला ताब्यात घेतले आहे. त्याने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्याच्या चर्चेचीही त्याच्याकडे कसून चौकशी केली जात आहे.
नायगाव तालुक्यातील नावंदी येथील एका युवकाने आपल्या ट्विटर हँडलवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी काही दिवसांपूर्वी दिली होती. सायबर सेलच्या माध्यमातून मुंबई पोलीस आणि नांदेड एटीएस यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आणि थेट बॉम्बने उडविण्याची धमकी देणाऱ्या नावंदी येथील युवकास मंगळवार, दिनांक 23 मे रोजी पहाटे दोन वाजताच्या सुमारास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेतले.
नायगाव पोलीस ठाण्यात त्याला आणून त्याची चौकशी करण्यात आली. यानंतर पुढील चौकशीसाठी पथक त्याला आपल्यासोबत घेऊन गेल्याचे समजते. श्रीपाद गोरटकर असे या युवकाचे नाव असून त्याची कसून चौकशी सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻