Friday, November 22, 2024

अमित शाह यांची सभा: नांदेड शहरातील अनेक मार्ग राहणार बंद, वाहतूक व्यवस्थेत बदल

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

१० जून रोजी सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत असेल बदल

नांदेड: नांदेड शहरात उद्या शनिवार 10 जून 2023 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे भाजपा पक्षातर्फे अबचलनगर मैदान नांदेड येथील आयोजित जाहीर सभेस उपस्थित राहणार आहेत.

या सभेच्या अनुषंगाने नियमित चालणाऱ्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थेत तात्पुरत्या स्वरुपात बदल करण्यात आला आहे. याबाबत महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 36 अन्वये पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी अधिसूचना निर्गमीत केली आहे. ही अधिसूचना शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत लागू राहिल.

आसना ते विमानतळ टीपॉईट, शिवमंदीर-राज कार्नर-वर्कशॉप-भाग्यनगर-आनंदनगर-नाईक चौक-अण्णाभाऊ साठे चौक-यात्री निवास-चिखलवाडी कॉर्नर-गुरुद्वारा गेट नंबर 1 कडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. नाईक चौक-महाराणा प्रताप चौक ते बाफना टीपॉइटकडे  येणारा-जाणारा रस्ता हा वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. देगलूरनाका-बाफना टी पॉइट ते हिंगोली गेटकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील. जुना मोंढा ते कविता रेस्टॉरेन्टकडे येणारा-जाणारा रस्ता वाहतुकीस पूर्णपणे बंद राहील.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग 

पुर्णा रोडवरून येणारी छोटी वाहने ही छत्रपती चौक-मौर चौक-पावडेवाडी नाका-रेस्ट हाऊस मार्गे शहरात ये-जा करतील. तसेच मोठी वाहने ही शेतकरी पुतळा-कॅनॉल रोड-साई मंदीर-संकेत हॉस्टेल मार्गे नवीन आसना बायपासने आसना टी पॉइन्ट येथून महामार्गावरून बाहेर जातील.

मालेगाव रोडने येणारी मोठी वाहने पासदगाव-संकेत हॉस्टेल तरोडा मार्गे आसना हायवेकडे जातील व छोटी वाहने छत्रपती चौक-मौर चौक-पावडेवाडी नाका-रेस्ट होऊस मार्गे ये-जा करतील.

वाजेगावकडून येणारी वाहने वाजेगाव-देगलूर नाका-बाफना टी पॉइन्ट मार्गे हिंगोली गेटकडे येणारी-जाणारी छोट्या वाहनांची वाहतुक देगलूरनाका ते माळटेकडी रोडचा वापर करतील व मोठी वाहने वाजेगाव ते धनेगाव मार्गे बायपासचा वापर करतील.

जुना मोंढा ते कविता रेस्टारेन्ट ते बाफना टी पॉइन्टकडे येणारी-जाणारी वाहतुक दैनाबॅक महावीर चौक-वजिराबाद चौक या रस्त्याचा वापर करतील.

शंकरराव चव्हाण चौक मार्गे सभेसाठी येणारी वाहने माळटेकडी उडान पुलाच्या खालुन नमस्कार चौक-महाराणा प्रताप चौक मार्गे खालसा हायस्कूल पार्कीग मैदानावर जातील.

देगलूर, बिलोली, नायगावकडून सभेसाठी येणारी वाहने केळी मार्केटच्या जवळील चैतन्य बापु देशमुख यांच्या जागेत पार्कींग करतील.

लोहा, कंधार, उस्माननगर, मुखेडकडून येणारी वाहने यात्री निवास मैदान येथे पार्कींग करतील.

वाहतुकीस अडथळा होऊ नये म्हणून वरीलप्रमाणे शनिवार 10 जून 2023 रोजी सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत या पर्यायी मार्गाची अधिसूचना नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी प्रसिद्ध केली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!