ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
◆ भाजपने राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले
◆ राज्यभरातील जिल्हाध्यक्षांची यादी 👇🏻
नांदेड– नांदेड जिल्ह्यात आता भारतीय जनता पक्षाचे दोन जिल्हाध्यक्ष असणार असून या पदांवर संतूकराव हंबर्डे आणि किनवटचे सुधाकर भोयर या दोघांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर महानगर अध्यक्षपदी दिलीप कंदकुर्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भारतीय जनता पक्षाने राज्यभरातील जिल्हाध्यक्ष बदलले आहेत. यात नांदेड जिल्ह्यातील जिल्हाध्यक्षही बदलण्यात आले असून नांदेड जिल्ह्यात ग्रामीणला दोन जिल्हाध्यक्ष देण्यात आले आहेत. याशिवाय नांदेड महानगरासाठी पूर्वीप्रमाणेच महानगराध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपकडून जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष बदलले जाणार असल्याने गेल्या काही दिवसांपासून या पदावर वर्णी लागावी यासाठी मोठी चढाओढ निर्माण झाली होती. आज सकाळी अखेर राज्यभरातील विविध जिल्ह्यांच्या जिल्हाध्यक्षांची नावे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलि. यात नांदेडमध्ये भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर यांच्या जागी नांदेड दक्षिण साठी जिल्हाध्यक्षपदी संतुकराव हंबर्डे यांची तर नांदेड उत्तर साठी सुधाकर भोयर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचबरोबर नांदेड महानगर अध्यक्षपदी प्रवीण साले यांच्या जागी दिलीप कंदकुर्ते यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
आता ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेले संतुकराव हंबर्डे यांनी यापूर्वी भाजपच्या नांदेड महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. तर आता महानगर अध्यक्षपदी नियुक्ती झालेले दिलीप कंदकुर्ते यांनीही भाजपच्या महानगर अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळलेली आहे. नांदेड उत्तर च्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेले सुधाकर भोयर यांना जिल्ह्यात प्रथमच मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भोयर यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद त्याचबरोबर आरएसएस मध्ये सक्रियपणे काम केलेले आहे. यापूर्वी भाजपच्या राज्य कार्यकारिणीत त्यांचा समावेश होता. गेल्या अनेक निवडणुकांपासून भोयर हे किनवट विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक होते. पक्षाने आता त्यांच्यावर जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली आहे.
सुधाकर भोयर यांच्या रूपाने भाजपने पक्षातील जुन्या कार्यकर्त्याला संधी दिल्याचे दिसत आहे. मात्र, इतर एक जिल्हाध्यक्ष आणि महानगराध्यक्ष यांची नियुक्ती करताना इतर पक्षातून आलेल्या नेत्यांनाही योग्य संधी भाजपाने दिल्याचे या नियुक्त्यांच्या निमित्ताने दिसून येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻