ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
■ शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम यांचाही राजीनामा
नांदेड- मराठा आरक्षणासाठी समाज बांधव आक्रमक झाले असून पुढा-यांना गावबंदी केली आहे. दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षण आणि आरक्षणाच्या आंदोलनाला पाठिंबा देत, हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी आज आपल्या खासदारपदाचा राजीनामा दिला आहे. लोकसभा अध्यक्षांच्या नावे त्यांनी आपला राजीनामा सादर केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा आरक्षणाच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. या उपोषणास आता राज्यभर पाठींवा मिळत आहे. आरक्षण मिळेपर्यंत राजकीय नेत्यांना गावात येवू न देण्याची भूमिका मराठा समाजाने घेतली असून अनेक गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राजकीय कार्यक्रमाला सुध्दा विरोध करण्यात येत आहे. यासोबतच मराठा समाजाने आपल्या गावासह तहसील आणि जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरु केले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे हिंगोलीचे शिवसेना खासदार हेमंत पाटील यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या पदाचा राजीनामा पाठविला आहे. या राजीनामा पत्रात, मराठा समाजाच्या आरक्षणाचा विषय अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. याविषयी याविषयी समाजाच्या भावना अतिशय तीव्र असून मी अनेक वर्षापासून मराठा समाजासाठी शेतकऱ्यांसाठी भांडडणारा कार्यकर्ता आहे. यामुळे आरक्षणाच्या आंदोलनाला माझा पाठींबा असून आरक्षणासाठी मी माझ्या खासदार पदाचा राजीनामा देत आहे, असे खा. हेमंत पाटील यांनी नमुद केले आहे. दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर यांनीही आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻