ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड/ लातूर – लातूर नांदेड या राष्ट्रीय महामार्गावर ऊसाच्या ट्रॅक्टरला भरधाव कार पाठीमागून धडकल्यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात नांदेड येथील चौघांचा मृत्यू झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तुळजापूर येथे देवदर्शनासाठी जाताना रविवारी पहाटेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. भीषण अपघात झाला. ही घटना आष्टामोड ते महाळंग्रा पाटी दरम्यान घडली. सर्व मयत नांदेड शहराच्या सराफा व होळी भागातील रहिवासी आहेत.
नांदेड येथील पाच तरूण एम. एच. २६ बी. सी. ८२८६ क्रमांकाच्या कारमधून तुळजापूरकडे निघाले होते. लातूर- नांदेड महामार्गावरील आष्टामोड ते महाळंग्रा पाटीच्या दरम्यान शेतकऱ्यांचा उसाच्या ट्रॅक्टर उभा होता. त्यावेळी भरधाव वेगात असलेल्या कारला रस्त्याच्या कडेला उभा असलेला हा ट्रक्टर न दिसल्यामुळे कारने ट्रॅक्टरला पाठीमागून जोराची धडक दिली. या भीषण धडकेत कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे जण उपचार घेत असताना मृत पावले. तर एक गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
मयताच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. कारमधील शिवराम हरिश्चंद्र लंकाढाई (वय २६) रा. किल्लारोड नांदेड, मोनु बालाजी कोतवाल (वय २७), नरमण राजाराम कात्रे (वय ३३), कृष्णा यादव रा. नांदेड यांचा मृत्यु झाला असून शुभम किशोर लंकाढाई रा. नांदेड गंभीर जखमी आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻