Saturday, December 21, 2024

नांदेड: माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे निधन

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – देगलूर बिलोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार गंगाराम ठक्करवाड यांचे आज शुक्रवारी पहाटेच्या सुमारास दिर्घ आजाराने निधन झाले. ते ८५ वर्षांचे होते. कासराळी ता.बिलोली येथील ग्रामपंचायतीचे सरपंच ते विधानसभा सदस्य असा ठक्करवाड यांचा राजकीय प्रवास राहीला आहे.

१९९९ मध्ये ते बिलोली विधानसभेतून जनता दलतर्फे ते विजयी झाले होते. दिवंगत माजी राज्यमंत्री गंगाधरराव कुंटुरकर यांचा पराभव करुन त्यांनी विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. २००३ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या काँग्रेस आघाडीला त्यावेळी त्यांनी पाठिंबा दिला होता. त्यानंतर त्यावेळच्या अविश्वास ठरावाच्यावेळी ते शिवसेना – भाजपा युतीच्या बाजुने उभे राहीले होते, त्याची मोठी चर्चा राज्यभर झाली होती. त्यानंतर ठक्करवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी बिलोली पंचायत समिती सभापती, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक म्हणूनही कार्य केलेले आहे.

ठक्करवाड यांच्यावर कासराळी येथे आज शुक्रवारी दि. ०८ मार्च रोजी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलं, मुली, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. भाजपाचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी जि. प. सदस्य लक्ष्मण ठक्करवाड यांचे ते वडील होत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!