Sunday, September 8, 2024

काँग्रेस सोडताना अशोक चव्हाण सोनिया गांधींकडे रडले का? नांदेडमध्ये खा. अशोकरावांनी दिले राहुल गांधींना प्रत्युत्तर

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड – ज्येष्ठ नेते काँग्रेस सोडताना सोनिया गांधींकडे रडले असा दावा काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी अशोक चव्हाण यांच्याबाबत नाव न घेता केला. यावर आता खा. अशोक चव्हाण यांनी पुढे येत राहुल गांधी यांचा दावा खोडून काढला आहे. राहुल गांधी यांचे विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आणि चुकीचं असल्याचे खा. चव्हाण यांनी म्हटले आहे.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रेचा काल रविवारी मुंबईतील शिवतीर्थावर समारोप झाला. या कार्यक्रमात इंडिया आघाडीतील सर्व मित्रपक्षांचे नेते आणि असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.

या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे नाव न घेता एका मोठा गौप्यस्फोट केला आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक मोठे नेते काँग्रेस पक्ष सोडत होते. त्यावेळी माझ्या आईसमोर (सोनिया गांधी) रडून सांगत होते मला लाज वाटतेय, माझी या शक्तीविरोधात लोकांविरोधात लढण्याची ताकद नाही. मला तुरुंगात जायचं नाही, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, राहुल गांधींनी हे विधान जाणीवपूर्वक अशोक चव्हाण यांच्यासाठीच केले, हे सर्वांच्याच लक्षात आले.

यावर खुद्द अशोक चव्हाण यांनी पुढे येत, नांदेडमध्ये यावर भाष्य केले आहे. आज माध्यमांशी बोलताना खा. चव्हाण म्हणाले की, मी याबाबत कधीही सोनिया गांधी यांना भेटलो नाही आणि माझी भावना व्यक्त केली नाही. यामुळे राहुल गांधी यांचे विधान माझ्यासंदर्भात असेल तर ते हास्यास्पद आहे. त्यांचे हे विधान चुकीच आहे. खा. अशोक चव्हाण म्हणाले की, मी सोनिया गांधी यांना भेटलो नाही. त्यामुळे मी सोनिया गांधी यांना भेटून माझी भावना व्यक्त केल्याचे विधान चुकीचे आणि दिशाभूल करण्यासारखं आहे. मी काँग्रेसमध्ये असेपर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम करत होतो. मी पक्ष सोडेपर्यंत ही माहिती कोणालाही नव्हती ही वस्तुस्थिती आहे, असे चव्हाण म्हणाले. त्यामुळे राहुल गांधी यांचे विधान माझ्या संदर्भात असेल तर ते चुकीचं आहे. असे अशोक चव्हाण यांनी आज नांदेडमध्ये स्पष्ट केले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!