ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड)- अर्धापूर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार राम पवार हे दि.३१ शुक्रवारी रोजी मध्यरात्री चोरंबा पाटी येथे फिक्स पॉईंट लावून अवैध वाहतूक रोखण्यासाठी वाहनाची तपासणी करत होते. पिकपची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेल्या ट्रकने त्यांना उडवले. यात गंभीर जखमी झालेले पोलीस हवालदार राम पवार यांचा मृत्यू झाला आहे.
राम पवार यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना जखमी अवस्थेत अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. हवालदार राम पवार हे फिक्स पॉईंटवर पिकअप क्र.एम.एच.२०-इ.जी.७८४४ या वाहनाची तपासणी करीत असताना पाठीमागून आलेल्या आर.जे.०९-जि.सी.९९४५ क्रमांकाच्या ट्रकने राम पवार यांना उडवले, यात ते गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला मार लागल्याने त्यांना अर्धापूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.
या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलीस ठाण्यात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेची माहिती करतात पोलीस अधीक्षक अप्पर पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी नांदेड ग्रामीण यांनी घटनास्थळी भेट देऊन घटनेची माहिती घेऊन पिकप जीप व ट्रक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अर्धापूर पोलिसात सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻