ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– शहराजवळ असलेल्या वाडी बुद्रुक गावातील एका नाल्याजवळ बंदुकीच्या गोळ्यांचा मोठा साठा आढळून आला आहे. जवळपास ४०० पेक्षा जास्त बंदुकीच्या गोळ्यांचा हा साठा आहे. एका शेतकरी मुलाला हा साठा आढळून आल्यानंतर त्याने घरच्यांना ही माहिती दिली. या माहितीनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत हा साठा जप्त केला आहे. ह्या बंदुकीच्या गोळ्यांचा साठा कोणी आणि का केला? याचा शोध आता नांदेड पोलीस घेत आहेत.
मौजे पावडेवाडी शिवारातील राहणारा आकाश रामराव पावडे (वय 24 वर्षे) हा पावडेवाडी शिवारातील नाल्या मधील झाडाझुडपामध्ये मध काढण्यासाठी गेला असता त्याला नाल्यामध्ये राऊंन्ड (काडतुसं) दिसुन आले. सदरची माहीती तात्काळ पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे पोलीस स्टेशन भाग्यनगर व वरील गुन्हे शोध पथकातील अधिकारी व अमंलदार यांनी सदर ठिकाणी आकाश रामराव पावडे याच्यासह जावुन पाहणी केली. तेव्हा त्यांना पावडेवाडी शिवारातील नाल्यामध्ये 436 राऊन्ड (काडतुसं) नाल्याच्या मातीमध्ये अर्धवट उघडे पडलेले व गंजुन जीर्ण झालेल्या अवस्थेत मिळुन आलेले आहेत. सदर राऊंन्ड (काडतुसं) पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर राऊंन्डवर पाठीमागील फायर कॅपवर 7.62 OFV-78-M-80-असे कोरीव लिहिलेले आहे.
या लाईट मशीन गणच्या गोळ्या असल्याचे सांगण्यात येते. LMG हे अत्यंत प्रतिबंधित शस्त्र आहे. ४०० पेक्षा जास्त बंदूक गोळ्यांचा साठा आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात हा साठा सापडल्यानंतर पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड शहराच्या सहायक पोलीस अधिक्षक किरितीका सी.एम., भाग्यनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेंडगे, स्थानिक गुन्हे शाखेचे उदय खंडेराय तसेच इतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह फॉरेन्सीकचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. दहशतवाद विरोधी पथक, श्वान पथक यांच्याकडून कसून तपासणी केली जात आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻