ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड – मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बांधण्यात आलेल्या येथील श्री गुरु गोविंदसिंग विमानतळालाही धारा लागल्या आहेत. विमानतळाची बातमी सोशल माध्यमावर व्हायरल झाल्याने विमानतळ प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली आहे. जागोजागी बकेट्स लावून स्वच्छता कर्मचाऱ्यांमार्फत पाणी काढण्याचे काम सुरू आहे.
नांदेड येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे श्री गुरु गोविंदसिंग विमानतळ आहे. विमानतळावरून देशाच्या विविध महत्त्वाच्या शहराला विमान सेवा आता सुरू आहे. मधल्या काळात बंद असलेली विमानसेवा पुन्हा विमानसेवा सुरू झालेली आहे. प्रवाशांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सध्या नांदेडहून नागपूर, पुणे, बेंगलोर, अहमदाबाद, दिल्ली, तिरुपती अशी विमान सेवा सुरू आहे.
मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने सर्वत्र जिल्हा जलमय झाला आहे. यात नांदेडच्या विमानतळालाही धारा लागल्या आहेत. विमानतळ बांधकाम झाले तेव्हापासून देखभाल व दुरुस्ती न झाल्याने हा प्रकार घडला असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ही बाब बाहेर पडू नये याची विमानतळ प्रशासनाने खबरदारी घेतली होती. मात्र हा प्रकार उघड झाला आहे. ज्या ठिकाणी विमानतळ गळत आहे, अशा ठिकाणी बकेट्स लावून पाणी जमवणे सुरू आहे. तर जमा झालेले पाणी महिला स्वच्छता कर्मचाऱ्याकडून बाहेर काढण्यात येत आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻