ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

व्हिडिओ 👇🏻
नांदेड (प्रतिनिधी)- तालुक्यातील आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी घेऊन मजूर घेऊन जाणारा ट्रॅक्टर रस्त्याशेजारी असलेल्या विहिरीत कोसळला. ट्रॅक्टरमध्ये दहा मजूर होते. त्यापैकी दोघेजण बाहेर निघाले. आठ मजूर ७० फूट पाण्यात अडकले होते, यातील बहुतांश गतप्राण झाल्याचा अंदाज आहे. पोलीस, महसूल प्रशासनाचे तसेच फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले. ही घटना आज शुक्रवार, दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली.
नांदेड तालुक्यातील आलेगाव शिवारात हळद काढण्यासाठी जवळच असलेल्या गुंज येथील महिला व अन्य मजूर असे दहा जण एका ट्रॅक्टरमधून जात होते. ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने ट्रॅक्टर रस्त्याच्या कडेला असलेल्या ७० फूट खोल असलेल्या विहिरीत कोसळले. यातील दोघेजण बाहेर निघाले तर आठ जण विहिरीतील पाण्यात अडकले. दोन जनरेटर वापरून व कृषी पंपाच्या साह्याने पाणी उपसा करण्यात आला. निळा, आलेगाव, गुंज येथील गावकऱ्यांनीही घटनास्थळी अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.
सात जणांचा मृत्यू
वसमत तालुक्यातील गुंज येथील महिला नांदेड जिल्ह्यातील आलेगाव येथे हळद काढणी कामासाठी जात असताना त्यांना घेऊन जाणारा ट्रँक्टर विहिरीत पडून झालेल्या या अपघातात सात महिलांचा मृत्यू झाला आहे. तर तिघेजण बचावले आहेत. त्यात दोन महिला व एक पुरुष बचावला आहे.
मृतांची नावे
ताराबाई सटवाजी जाधव (वय ३५), ध्रुपता सटवाजी जाधव (वय १८), सरस्वती लखन बुरड (वय २५), सिमरन संतोष कांबळे (वय १८), चउत्राबाई माधव पारधे (वय ४५), ज्योती इरबाजी सरोदे (वय ३५) सपना तुकाराम राऊत (वय २५).
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
