ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

⚠️ दौंड आणि मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे काम
नांदेड (प्रतिनिधी)- मध्य रेल्वेने नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दौंड आणि मनमाड रेल्वे मार्गावरील दुहेरीकरणाचे महत्त्वाकांक्षी काम हाती घेतल्यामुळे पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांचे वेळापत्रक कोलमडणार आहे. या कामामुळे नांदेडहून पुण्याला जाणाऱ्या दोन्हीही रेल्वे गाड्या दोन दिवस पूर्णपणे बंद राहणार आहेत. नांदेडहून पुण्याकडे जाणाऱ्या गाड्या 23 आणि 24 जानेवारी रोजी तर पुण्याहून नांदेड कडे येणाऱ्या रेल्वे गाड्या दिनांक 24 आणि 25 जानेवारी रोजी बंद असणार आहेत.
या कामामुळे 4 ते 25 जानेवारी या कालावधीत सुमारे 15 हून अधिक एक्सप्रेस गाड्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर, लांब पल्ल्याच्या गाड्यांना विलंब होणार असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत.
रद्द झालेल्या महत्त्वाच्या गाड्या
दुहेरीकरणामुळे रद्द झालेल्या गाड्यांमध्ये नागपूर, अमरावती, सोलापूर, लातूर, नांदेड, पनवेल या मार्गावरील गाड्यांचा समावेश आहे.
गाडी आणि तारीख
•नांदेड-पनवेल एक्स्प्रेस 23 आणि 24 जानेवारी (दोन दिवस)
•पनवेल-नांदेड एक्स्प्रेस 24 आणि 25 जानेवारी (दोन दिवस)
•नांदेड-पुणे एक्स्प्रेस 23 आणि 24 जानेवारी (दोन दिवस)
•पुणे नांदेड एक्सप्रेस 24 आणि 25 जानेवारी (दोन दिवस)
•पुणे-हरंगुळ एक्सप्रेस – २४ आणि २५ जानेवारी – दोन दिवस
•पुणे-नागपूर-पुणे गरीब रथ 23 आणि 24 जानेवारी (दोन दिवस)
•पुणे-अमरावती एक्सप्रेस 24 ते 25 जानेवारी (तीन दिवस)
•दादर-साईनगर शिर्डी एक्स. 21, 22 आणि 24 जाने (तीन दिवस)
या कामाचा सर्वाधिक फटका पुणे-सोलापूर मार्गावरील लोकल आणि एक्स्प्रेस गाड्यांना बसला आहे. पुणे रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 25 जानेवारी या 11 दिवसांच्या कालावधीत पुणे-सोलापूर-पुणे इंटरसिटी-इंद्रायणी एक्सप्रेस ही गाडी रद्द करण्यात आली आहे. याचबरोबर, पुणे-दौंड-पुणे आणि बारामतीपर्यंतची ‘डेमू’ लोकल सेवा 25 जानेवारीपर्यंत धावणार नाही.
लातूर, परळी, परभणी मार्गे
उत्तर आणि दक्षिण भारतात जाणाऱ्या सुमारे विविध 15 लांब पल्ल्याच्या गाड्यांना 4 ते 5 तासांपर्यंत विलंब होणार आहे. या कामामुळे सात गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने हुबळी-हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( 23 जानेवारी): सोलापूर, कुर्डुवाडी, लातूर, परळी, परभणी, मनमाड मार्गे वळवण्यात येईल. गोवा एक्सप्रेस (23 व 24 जानेवारी): मनमाड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, कर्जत, लोणावळा, पुणे मार्गे वळवण्यात येईल.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻



