ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
एमआयएमच्या उमेदवाराचा केला पराभव; भाजप उमेदवार तिसऱ्या स्थानावर
नांदेड– महापालिका प्रभाग क्रमांक १३ (अ) चौफाळा/ मदिनानगर पोट निवडणुकीकरिता मंगळवारी दि. २१ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या मुस्काना सय्यद वाजिद यांना 4230 मते मिळाली असून त्यांनी एमआयएमच्या रेश्मा बेगम यांचा 2005 मतांनी पराभव केला. तर भाजपच्या उमेदवार तिसऱ्या स्थानावर राहिल्या.
या निवडणुकीत ३७.४७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली होती.
सदर प्रभागांमध्ये एकूण २१ हजार ४५३ एवढे मतदार होते. त्यापैकी आठ हजार ३९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये महिला मतदार ३, ५०९ व पुरुष मतदार ४, ५३० यांनी मतदानाचा हक्क बजावला होता.
सदर पोटनिवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आर. डब्लू. मिटकरी, गुलाम सादिक व निवडणूक विभागातील इनामदार अक्तर बेग, महंमद युनूस अब्दुल गफार व इतर कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडलेली होती. तसेच पोलीस प्रशासनामार्फत योग्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
सदर प्रभागाची मतमोजणी बुधवारी दि. २२ डिसेंबर रोजी चार टेबलवर सात फेऱ्यामध्ये सकाळी दहा वाजता स्टेडियम परिसर येथे सुरु करण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या मुस्कान सय्यद वाजिद यांना 4, 230 मते मिळाली तर एमआयएमच्या रेश्मा बेगम यांना 2, 225 आणि भारतीय जनता पक्षाच्या पार्टीच्या व लक्ष्मी जोंधळे यांना 1, 490 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमध्ये मुस्कान सय्यद यांनी 2005 ची लीड घेऊन आपला विजय पक्का केला. त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी लतीफ पठाण यांनी विजय झाल्याचे प्रमाणपत्र देऊन शुभेच्छा दिल्या.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻