ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
# तीनही रुग्ण हिमायतनगर तालुक्यातील !
# ओमायक्रोनचे संकट टाळण्यासाठी आता अधिक सतर्कता आवश्यक
नांदेड- नांदेडकरांनी आता पुन्हा सावध होण्याची आवश्यकता आहे. कारण दक्षिण आफ्रिकेतून नांदेडमध्ये आलेले तीन जण निघाले कोरोनाबाधित आढळून आले आहे. त्यामुळे ओमायक्रोनचे संकट टाळण्यासाठी सर्वांनी सतर्कता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.
मागील पंधरवड्यात नांदेड जिल्ह्यात ३०२ नागरिक विविध देशातून आले आहेत. या 302 नागरिकांची कोरोना तपासणी करण्यात आलेली आहे, यातील तीन जण कोरोनाबाधित झाल्याचा अहवाल आला आहे. या तिन्ही रुग्णांचा जिवोनिक स्केक्वेंन्सिंगसाठी पुण्याच्या राष्ट्रीय प्रयोगशाळेत अहवाल पाठविण्यात आला आहे. यामुळे आता जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांचीही तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या या तीन जणांचा अहवाल पॉझिटिव आल्याने त्यांना सध्या हदगाव येथील उपजिल्हा रुग्णालयात विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हे तिन्ही रुग्ण हिमायतनगर तालुक्यातील असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. या तिन्ही रुग्णांचा सिक्वेन्सिंग अहवाल नेमका काय येतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी कोरोनाबाबतचे सर्व नियम पाळावेत तसेच लसीकरण करून घ्यावे असे आवाहन जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी बालाजी शिंदे यांनी केले आहे.
या प्रकारानंतर नांदेडवर ओमायक्रोनचे सावट दिसत असले तरी हे संकट येऊ नये अशीच सर्वांची अपेक्षा असून नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻