Saturday, April 20, 2024

अखेर रवि कहाळेकरच्या मारेकऱ्यास अटक करण्यात पोलिसांना यश

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

जबरी चोरी करुन खून करणाऱ्या नांदेडच्या तीन आरोपींना पोलिसांनी केले जेरबंद

लोहा– अखेर रवि कहाळेकरच्या मारेकऱ्यास अटक करण्यास पोलिसांना यश आले आहे. जबरी चोरी करून खून करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे.

गेल्या जवळपास 40 दिवसांपूर्वी जुना लोहा येथील युवक ‌रवि कहाळेकर यांच्यावर चोरट्यांनी चाकुने जीवघेणा हल्ला करून त्यांच्याजवळील मोबाईल व रोख रक्कम घेऊन ते पसार झाले होते. उपचारांदरम्यान रवि कहाळेकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्यामुळे लोहा शहरामध्ये खळबळ उडाली होती.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी की, लोहा बस स्थानकासमोर दिनांक 11/11/2021 रोजी फिर्यादी नामे गोपीचंद जयवंत कहाळेकर यांनी फिर्याद दिली की, त्यांचा भाऊ रवि कहाळेकर यांना दिनांक 10- 11- 2021 रोजी रात्री 1.30 वाजेच्या सुमारास मोटार सायकलवरील तीन अज्ञात इसमांनी बसस्थानकावर अडवून चाकूने पोटात मारुन त्यांचेकडील 10,000/- असलेले पॉकेट व ओपो कंपनीचा मोबाईल असे जबरीने चोरुन नेले. त्यांचे या फियांदीवरुन पो.स्टे. लोहा येथे  गुरनं 232 202। कलम 394.34 भार्दाब प्रमाणे दाखल करुन गुन्हयाचा तपास सपोनि शेख यांच्याकडे देण्यात आलेला होता. सदर गुन्हयातील जखमी रवि कहाळेकर यांचा उपचारादरम्यान मुंबई येथे मृत्यू झाल्याने गुन्ह्यात कलम 397, 302 भा.द.वि. प्रमाणे वाढ करण्यात आली.

सदर गुन्हयाचे अनुषंगाने गोपनीय माहितोच्या आधारे व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक माहितीचे आधारे आरोपी नामे 1. इस्माईल शेख ऊर्फ चोलो महमम्मद अली. 2. शेख सलमान शंख युसूफ व 3. शेख महम्मद केफ महम्मद गौस सर्व रा. फारुखनगर नांदेड यांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न केले. वरील गुन्हयातील आरोपींचा शोध घेवुन अटक करणेकामी पोलोस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन सांगळे, मारुती थोरात, पोलीस निरीक्षक व्दारकास चिखलीकर, स्था.गु.शा., नांदड यांचे मार्गदर्शनाखाली पोनि संतोष तांबे ब सपोनी गफार शेख यांनी तपास करुन आरोपी निष्पन्न केलेले आहेत.

सदर तीनही आरोपींना पो.स्टे. विमानतळ येथील गुन्हयात कलम 307 च्या गुन्हयात अटक केलेली असल्याने सदर आरोपींचा इकडील गुन्हयात वर्ग करुन गुन्हयात वापरलेले हत्यार हस्तगत करण्यात आलेले आहे. सदर गुन्हयातील आरोपी हे निजामाबाद येथे चोरीचे मोबाईल विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने चोरीचे मोबाईल खरेदी करणारा इसम नामे महम्मद आसफ अब्दुल कयुम रा. ऑटोनगर निजामाबाद यास अटक करण्यात आलेली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!