Thursday, September 21, 2023

अज्ञातांनी डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांची समाधी खोदली, अस्थींसह अष्ट धातूची पेटी लंपास; विश्वस्तांची पोलिसात तक्रार

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ उकरल्यामुळे समाधी स्थळावर मोठा खड्डा

विश्वस्तांनी दिलेली तक्रार 👇🏻

अहमदपूर (जि. लातूर): अहमदपूर तालुक्यातील भक्तीस्थळ येथील राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांची समाधी खोदून महाराजांच्या अस्थींसह अष्ट धातूंची पेटीच अज्ञातांनी लंपास केल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकारामुळे लिंगायत समाजातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांना १ सप्टेंबर २०२० रोजी वयाच्या १०४ व्या वर्षी देवाज्ञा झाली. अहमदपूर तालुक्यातील भक्तीस्थळ येथे २ सप्टेंबर २०२० रोजी शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी करण्यात आला. त्यानंतर त्या ठिकाणी महाराजांची विधिवत समाधी बांधण्यात आली. मात्र दि. ८ नोव्हेंबर २०२२ रोजी समाधी स्थळाची विटंबना करून महाराजांच्या अस्थी ठेवलेली तीन बाय तीन आकाराची अष्ट धातूची पेटी, तसेच बांधलेली समाधी खोदून त्यावरील महादेवाची पिंडही अज्ञातांनी पळवून नेल्याचा खळबळजनक आरोप भक्तीस्थळ विश्वस्त मंडळाने एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केला आहे. या गंभीर प्रकरणाची तक्रार देशाचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री-गृहमंत्री, लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहमदपूरचे तहसीलदार तसेच अहमदपूर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांच्या समाधी स्थळाची विटंबना करण्याचा घाट काही जण घालत असल्याची तक्रार दि. ५ सप्टेंबर २०२२ रोजी विश्वस्त मंडळाने एका निवेदनाद्वारे लातूरचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली होती. ही शंका खरी ठरली असून समाधी उकरून समाधी स्थळाचे पावित्र्य भंग करणाऱ्या अज्ञात आरोपी विरोधात कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करावी. तसेच अस्थी ठेवलेली अष्ट धातूंची पेटी, त्यातील सर्व अस्थी, महादेवाची पिंड परत मिळवून भक्ती स्थळाला संरक्षण देण्याची मागणी विश्वस्त मंडळाने निवेदनाद्वारे केली आहे. या निवेदनावर माधवराव अण्णाराव बरगे, सुभाष वैजनाथ सराफ, बब्रुवान देवराव हैबतपुरे, व्यंकटराव गंगाधरराव मद्दे, शिवशंकर बळीराम मोरगे, संदीप लक्ष्मणअप्पा डाकुलगे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

राष्ट्रसंत डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराजांचा अंत्यसंस्कार शासकीय इतमामात पार पडल्यानंतरही अशा पद्धतीने समाधीची विटंबना होऊन अस्थी पळवून नेल्यामुळे भक्तांमधून संताप व्यक्त होत आहे.  महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेशसहित देशभरातील भाविकांमध्ये हा रोष व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!