ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- टेरर फंडिंग प्रकरणात राष्ट्रीय तपास संस्थेकडून देशभरात पापुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांवर धाडी टाकण्यात येत आहेत. नांदेडमध्येही देगलूर नाका भागात काल रात्री छापा मारुन मेराज अन्सारी या पीएफआयच्या सदस्याला एनआयएच्या सूचनेवरून एटीएसने ताब्यात घेतले आहे. त्याची कसून चौकशी सुरू असून एटीएसकडून गोपनीय पद्धतीने ही सर्व कारवाई करण्यात येत आहे.
महिनाभरपूर्वीच नांदेडमध्ये एनआयएची दिल्लीची टीम पहाटे तीन वाजता धडकली होती. त्यावेळी देगलूर नाका भागातून एका मौलवीसह अन्य तिघांना ताब्यात घेऊन तब्बल 12 तास चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर नोटीस देऊन त्यांना सोडण्यात आले होते. त्यानंतर आता काल बुधवार दि. २१ सप्टेंबर रोजी रात्री एनआयएच्या सूचनेवरून एटीएस पथक पुन्हा नांदेड शहरात दाखल झाले. एटीएसच्या अधिकाऱ्यांनी देगलूर नाका भागात छापा मारुन पीएफआयच्या मेराज अन्सारी याला ताब्यात घेतले आहे. अन्सारी याचे या भागात किराणा आणि इतर वस्तू विक्रीचे दुकान आहे. रात्रीपासून एटीएस कार्यालयात त्याची चौकशी सुरू आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻