Saturday, July 27, 2024

अफवेचा बळी: नातवाच्या अपघाती मृत्यूची अफवा ऐकून आजीने सोडला प्राण; किनवट तालुक्यातील घटना

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

किनवट (जि. नांदेड)- दुचाकीच्या अपघातात नातवाचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली आणि हीच अफवा त्या नातवाच्या आजीच्याही कानी पडली. नातवाच्या मृत्यूची ही खबर (खोटी असणारी) ऐकून आजीला जबर मानसिक धक्का बसला आणि यातच तिचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना किनवट तालुक्यात घडली आहे.

किनवट तालुक्यातील मांडवी ते पाटोदा (बुद्रुक) रस्त्यावर दोन दुचाकींचा अपघात झाला. यात एक युवक ठार झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. एक युवक तर ठार झालाच, पण तीन जखमींपैकीही एक जण अनिकेत रेणके ठार झाल्याची अफवा पसरली. ही अफवा जखमी अनिकेत रेणकेच्या आजीलाही कळली, आणि आजीला याचा जबर मानसिक धक्का बसला. चुकीची माहिती मिळाल्याने त्याच्या आजीचा या धक्क्यामुळे मृत्यू झाला.

शिवजयंतीचे सामान खरेदीसाठी विवेक गणपत सोनुले (वय २०), अनिकेत रवी रेणके (वय १९ रा. पाटोदा बु. ता. किनवट) हे पाटोद्यावरून मांडवीकडे दुचाकीवरून निघाले होते. तर विरुद्ध दिशेकडून म्हणजेच मांडावीकडून आशना कुंटलवार (वय ४६) आणि लक्ष्मण धर्मा कुमरे (वय ३९, रा. लिंगी, ता. किनवट) हे दुचाकीने (टीएस-०१, ईए-२०३६) मांडवीहून लिंगीकडे जात होते.

या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. त्यात चारही जण जखमी झाले. यात विवेक सोनुले व अनिकेत रेणके हे गंभीर असल्यामुळे त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी आधी आदिलाबाद व तेथून नागपूरकडे नेण्यात येत होते. पण नागपूरकडे नेले जात असतानाच सोनुले याचा वाटेतच मृत्यू झाला.

पण या घटनेतील गंभीर जखमी अनिकेत रेणके याचा मृत्यू झाल्याची अफवा गावात पसरली. ही माहिती ऐकून त्याची आजी छबूबाई शंकर रेणके यांना मोठा मानसिक धक्का बसला. यातच त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान दोन दुचाकींमधील अपघातप्रकरणी साईनाथ गंगाधर सोनुले यांनी दिलेल्या तक्रारीवरून आशना कुंटलवार यांच्याविरुद्ध मांडवी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!