Sunday, October 6, 2024

अभिजित राऊत नांदेडचे नवे जिल्हाधिकारी तर डॉ. भगवंतराव पाटील नवे महानगरपालिका आयुक्त; किर्तीकुमार पुजार यांची किनवटहून रत्नागिरीला बदली

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अभिजित राऊत यांची जळगावच्या जिल्हाधिकारीपदावरुन तर डॉ. भगवंतराव पाटील यांची रत्नागिरीच्या जिल्हाधिकारीपदावरुन नांदेडला बदली

◆ राज्यातील 44 अधिकाऱ्यांच्या बदल्या

नांदेड- राज्याच्या प्रशासन विभागाने काल गुरुवार दिनांक 29 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा राज्यातील आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात नांदेडच्या जिल्हाधिकारी पदावर जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.भगवंतराव पाटील यांना नांदेड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचबरोबर किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी कीर्ती कुमार पुजार यांची रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नतीने बदली करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांची बदली झाल्यानंतर तब्बल दीड महिन्यांनी नांदेडला जिल्हाधिकारी मिळाले आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन हे जळगावचे असल्याने त्यांच्याच पसंतीनुसार जिल्हाधिकारी आले असावेत असा अंदाज वर्तविला जात आहे.

नांदेडहून जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर यांची बदली नागपूर जिल्हाधिकारी पदी झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागी अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी काम पाहत होते. त्यानंतर नांदेडला नवीन जिल्हाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबरोबरच राज्यभरातील बदल्या आज होतील, उद्या होतील अशा चर्चा झडत होत्या. त्यातच पंधरा दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सुनील लहाने यांची बदली परभणी महापालिकेचे आयुक्तपदी झाली होती, मात्र काही तासातच त्यांची बदली रद्द करून त्यांनाच नांदेडला कायम ठेवण्यात आले. मात्र आता गुरुवारी रात्री निघालेल्या आदेशामध्ये नांदेड महापालिकेच्या आयुक्तपदी रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ.भगवंतराव पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ. सुनील लहाने यांना मात्र वेटींगवर ठेवण्यात आले आहे.

नांदेडच्या जिल्हाधिकारीपदी अभिजित राऊत आणि महानगरपालिका आयुक्तपदी डॉ. भगवंतराव पाटील या दोन्ही अधिकाऱ्यांनी तातडीने आपला पदभार स्वीकारून वरिष्ठ कार्यालयास तसा अहवाल सादर करावा अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. या सोबतच किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी प्रकल्प अधिकारी कीर्ती कुमार पुजार यांचीही रत्नागिरी येथे मुख्य जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बदली करण्यात आली आहे.

आधिकाऱ्यांच्या बदल्याची यादी पुढीलप्रमाणे. नाव आणि कंसात नव्याने झालेल्या नियुक्तीचे ठिकाण या क्रमाने:

१) श्रीमती लीना बनसोड (अतिरिक्त आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे)

२) विवेक जॉन्सन (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, चंद्रपूर)

३) अभिजीत राऊत (जिल्हाधिकारी, नांदेड)

४) डॉ. रामास्वामी एन. (आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार आणि उद्यम, नवी मुंबई)

५) डॉ. हर्षदीप श्रीराम कांबळे (प्रधान सचिव, उद्योग विभाग)

६) श्रीमती.जयश्री एस. भोज (डीजीआयपीआर आणि एमडी, महा आयटी कॉर्पोरेशनचा अतिरिक्त कार्यभार)

७) परिमल सिंग (प्रकल्प संचालक, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)

८) ए.आर.काळे (आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई)

९) राजेश नार्वेकर (महापालिका आयुक्त नवी-मुंबई महानगरपालिका)

१०) अभिजीत बांगर (ठाणे महापालिका आयुक्त)

११) डॉ.विपिन शर्मा (मुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई)

१२) नीलेश रमेश गटणे, (मुख्य कार्यकारी अधिकारी,एसआरए, पुणे.)

१३) सौरभ विजय (सचिव, सांस्कृतिक आणि पर्यटन विभाग)

१४) मिलिंद बोरीकर (मुख्य अधिकारी, मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास मंडळ)

१५) अविनाश ढाकणे (मॅनेजिंग डायरेक्टर, दादासाहेब फाळके फिल्मनगरी)

१६) संजय खंदारे (प्रधान सचिव -१ सार्वजनिक आरोग्य विभाग)

१७) डॉ. अनबलगन पी.(अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विद्युत निर्मिती कंपनी)

१८) दीपक कपूर, (अतिरिक्त मुख्य सचिव, जलसंपदा विभाग)

१९) श्रीमती. वल्सा नायर (प्रधान सचिव, गृहनिर्माण)

२०) श्रीमती मनीषा पाटणकर-म्हैसकर (प्रधान सचिव आणि मुख्य प्रोटोकॉल अधिकारी, मंत्रालय, मुंबई आणि अतिरिक्त कार्यभार मराठी भाषा विभाग)

२१) मिलिंद म्हैसकर (प्रधान सचिव, नागरी विमान वाहतूक, सामान्य प्रशासन विभाग, मुंबई आणि अतिरिक्त प्रभार प्रधान सचिव राज्य उत्पादन शुल्क)

२२) प्रवीण चिंधू दराडे ( सचिव, पर्यावरण विभाग)

२३) तुकाराम मुंढे (आयुक्त एफडब्लू आणि संचालक, एनएचएम, मुंबई)

२४) अनुप कुमार यादव, (सचिव, अल्पसंख्याक विकास विभाग)

२५) डॉ. प्रदीप कुमार व्यास (अतिरिक्त मुख्य सचिव, आदिवासी विकास विभाग)

२६) डॉ. अश्विनी जोशी (सचिव, वैद्यकीय शिक्षण)

२७) दीपेंद्र सिंह कुशवाह (विकास आयुक्त,उद्योग)

२८) अशोक शिनगारे (जिल्हाधिकारी, ठाणे)

२९) श्रीमती श्रद्धा जोशी (महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे एमडी)

३०) मनुज जिंदाल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, ठाणे)

३१) सचिन ओंबासे (जिल्हाधिकारी, उस्मानाबाद)

३२) अमन मित्तल (जिल्हाधिकारी, जळगाव)

३३) राजेश पाटील (संचालक, सैनिक कल्याण, पुणे.)

३४) श्रीमती आशिमा मित्तल (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक)

३५) कीर्ती किरण एच पुजार (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी)

३६) रोहन घुगे (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद वर्धा)

३७) विकास मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, औरंगाबाद)

३८) श्रीमती वर्षा मीना (मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जालना)

३९) के.व्ही.जाधव (संयुक्त व्यवस्थापकीय संचालक, एमएसआरडीसी, मुंबई)

४०) कौस्तुभ दिवेगावकर, (प्रकल्प संचालक, बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण विकास प्रकल्प, पुणे)

४१) राजेंद्र निंबाळकर (व्यवस्थापकीय संचालक एमएसएसआयडीसी)

४२) विवेक एल. भीमनवार (परिवहन आयुक्त)

४३) डॉ. भगवंतराव नामदेव पाटील (महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा महानगरपालिका)

४४) एम.देवेंद्र सिंग (जिल्हाधिकारी, रत्नागिरी)

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!