ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड– अमरावती येथील महानगरपालिकेचे आयुक्त प्रवीण आष्टीकर यांच्यावर शाई फेकणाऱ्या आरोपीला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी या मागणी करीत नांदेड- वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला.
अमरावती महापालिकेचे आयुक्त प्रवीण श्रीराम आष्टीकर यांच्यावर अमरावती मध्ये काल दि. 9 फेब्रुवारी रोजी झालेल्या शाई फेक प्रकरणाच्या निषेधार्थ नांदेड महापालिका प्रशासनाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. आयुक्त प्रवीण अष्टीकर यांच्या अंगावर हल्लेखोरांनी जवळून शाई फेक करुन प्राणघातक हल्ला केला. काही कर्मचारी व अंगरक्षकामुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना गंभीर असून तमाम राज्यातील महापालिका कर्मचारी, अधिकारी या घटनेमुळे भयभीत झाले आहेत. घटनेचा निषेध करून अधिकारी व कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेची भावना वाटावी असे वातावरण निर्माण व्हावे अशी मागणी यावेळी करण्यात आली.
निषेध सभेमध्ये आयुक्त डॉ. सुनील लहाने, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, उपायुक्त शुभम क्यातवार, डॉक्टर पंजाब खानसोळे, सरदार अजितपालसिंग संधू, लेखाधिकारी शोभा मुंडे, सुधीर इंगोले, कार्यकारी अभियंता सुग्रीव अंधारे, अशोक सूर्यवंशी, रावण सोनसळे, एन. पी. कुलकर्णी, सदाशिव पतंगे, गुलाम सादिक, मनोज गरजे यांच्यासह महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻