Wednesday, July 24, 2024

अर्धापूरात जुन्या न्यायालयाच्या इमारतीजवळ सापडला मानवी हाडांचा सापळा: व्हिडिओ 👇🏻

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अर्धापूर (जि. नांदेड)- अर्धापूर शहरातील जुन्या न्यायालयाच्या इमारती बाजूला असलेल्या डीपीजवळ मानवी हाडांचा सापळा आढळून आला आहे. त्यामुळे येथे खळबळ उडाली असून बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. हा प्रकार दि,२६ सोमवारी रोजी सायंकाळी निदर्शनास आला. 

व्हिडिओ 👇🏻

अर्धापूर शहरातील मुख्य रस्त्यावर न्यायालयाच्या जुन्या इमारती बाजूला असलेल्या डीपीच्या जवळ मानवी सापळ्याचे अवशेष सापडले आहेत. यात कवटी, दोन पाय, दोन हात आदी असुन या ठिकाणी बघ्यांची गर्दी मोठ्या प्रमाणात जमली होती. यावेळी पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक कपिल आगलावे, जमादार भीमराव राठोड, संजय घोरपडे, राजू कांबळे, संदीप आनेबैनवाड, बालाजी कोकाटे, महेंद्र डांगे, विजय कदम यांनी घटनास्थळी भेट दिली.

पोलिसांनी हे अवशेष जप्त केले आहेत. सदर अवशेष कुणाच्या घात-पाताचा प्रकार आहे, की जादूटोण्याचा प्रकार असे अनेक तर्कवितर्क नागरिकांमधून काढले जात आहेत. सदर प्रकार नेमका काय आहे?! याची सविस्तर माहिती आणि कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!