Saturday, July 27, 2024

अर्धापूर नगरपंचायत निवडणुकीत १३ जागांसाठी ६५ उमेदवारांचे भवितव्य ‘इव्हीएम’मध्ये बंद

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

१३ हजार २७१ मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क

अर्धापूर- नगरपंचायतच्या १३ जागांसाठी २१ डिसेंबर रोजी झालेल्या निवडणुकीत सायंकाळ पर्यंत १३ हजार २७१ मतदारांनी हक्क बजावला. नगरपंचायतमधील ओबीसी जागा वगळल्याने ४ जागांची निवडणूक पुढे ढकलली, त्यामुळे एकूण १७ पैकी १३ प्रभागांसाठी मंगळवारी शांततेत मतदान झाले.

थंडीतही नागरिकांनी मोठ्या उत्साहात मतदानास सुरुवात केली. अर्धापूर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून चोख पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. एकुण १७ हजार ११३ मतदानापैकी सायंकाळपर्यंत १३ हजार २७१ मतदान झाले. प्रभाग क्रमांक ४ मध्ये सर्वाधिक १२७७ मतदान तर प्रभाग क्रमांक २ मध्ये सर्वात कमी ७०४ मतदान झाले आहे. पुरुष ७१०४ स्त्री ६१६७ एकुण १३२७१ झाले आहे.

अर्धापूर येथील मतदान केंद्रास जिल्हाधिकारी विपीन इटनकर यांनी भेट दिली. यावेळी निवडणूक व उपविभागीय अधिकारी विकास माने, साहाय्यक निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, तहसीलदार उज्वला पांगरकर, मुख्याधिकारी शैलेश फडसे, नायब तहसीलदार मारोतराव जगताप, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक मुंजाजी दळवी, पोलीस उपनिरीक्षक साईनाथ सुरवशे, पोउनि आगलावे,  झोनल अधिकारी अनिल शिरफुले, फौजदार म. तयब आदींनी निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. 

अर्धापूर नगरपंचायत निवडणूक प्रभागनिहाय मतदान

प्रभाग क्रमांक २- ७०४

प्रभाग क्रमांक ३- १०८९

प्रभाग क्रमांक ४- १२७७

प्रभाग क्रमांक ५- ९९०

प्रभाग क्रमांक ६- ८७४

प्रभाग क्रमांक ८- १०६२

प्रभाग क्रमांक १०- १२०९

प्रभाग क्रमांक ११- १२३०

प्रभाग क्रमांक १२- ११८४

प्रभाग क्रमांक १३- ८६०

प्रभाग क्रमांक १४-  ७१५

 प्रभाग क्रमांक १५- १०९५

प्रभाग क्रमांक १७ – ९८२

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!