ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर– कुंडलवाडी पाठोपाठ अर्धापूर तालुक्यातही खुनाची घटना घडली आहे. या तालुक्यातील अमराबाद तांडा येथे डुकराच्या मटनाचा हिस्सा देण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर एकास लाथा बुक्याने, लोखंडी राॅडने मारहाण करून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे.
अमराबाद तांडा येथील श्रीनिवास बालाजी पवार (वय २८) रा. अमराबाद तांडा यांनी डुकराच्या मटणासाठी १०० रूपये दिले होते. पण, तुला मटण पाहिजे असल्यास ३०० रूपये दे म्हणून श्रीनिवास बालाजी पवार (मयत) आणि इतर आरोपी रंजित अंगुर पवार, वकील अंगुर पवार, अंगुर बदू पवार व दोन महिला यांच्यात बाचाबाची होऊन नंतर जोरदार वाद झाला. हा वाद विकोपाला जाऊन श्रीनिवास बालाजी पवार (मयत) यास पाच जणांनी लोखंडी राॅडने मारहाण करीत खून केला. अमराबाद तांडा येथील या खूनाच्या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी (ग्रामीण) अर्चना पाटील, पोलीस निरीक्षक अशोक जाधव, सपोउपनी बाबुराव जाधव, राजेश घुन्नर, गुरुदास आरेवार यांनी घटनास्थळी भेट देऊन खूनाची माहिती घेतली.
काल दि.२८ फेब्रुवारी रोजी सोमवारी रोजी रात्री ९:३० ते १० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या खूनप्रकरणी अर्धापूर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीसांनी दिली आहे.
या खून प्रकरणी बालाजी हरलाल पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी रंजित अंगुर पवार, वकील अंगुर पवार, अंगुर बदू पवार व दोन महिला यांच्याविरुद्ध कलम ३०२, ३४ भादवि प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे, रूपेश नरवाडे हे करत आहेत.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻