ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
अर्धापूर (जि. नांदेड)- तालुक्यातील पार्डी मक्ता येथे आज सोमवार दि.२६ सप्टेंबर रोजी सकाळी आठच्या दरम्यान भरधाव ट्रक एका घरात घुसल्याची धक्कादायक घटना घडली. यात घरातील एक मुलगी गंभीर जखमी झाली होती. ग्रामीण रुग्णालयात उपचार दाखल करण्यात आला असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. या ट्रकने दोन मोटरसायकलचा चक्काचूर झाल्या आहेत.
देळुब येथून नांदेड मुख्य रस्त्याकडे जाणारा भरधाव ट्रक अचानक रस्त्याच्या बाजूच्या असलेल्या माणिकराव मदने यांच्या पार्डी येथील एका घरात घुसला. यात घरातील वर्षां माणिकराव मदने हिचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तर घरासमोरील दोन मोटरसायकलींचा यावेळी चुराडा झाला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक जाधव आदींनी घटनास्थळी धाव घेतली. या अपघातातील ट्रॅक (एम.एच.२६-बी.ई.९१९३) पोलीस उपनिरीक्षक कपील आगलावे, पोउनि साईनाथ सुरवशे, महेंद्र डांगे यांनी ताब्यात घेतला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻