Monday, October 14, 2024

अर्धापूर तालुक्यात शाॅर्टसर्किटने शेतकऱ्याचा ३ एकर ऊस जळाला; लाखोंचे नुकसान

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

अर्धापूर: तालुक्यातील गणपूर येथील शेतकऱ्याच्या ऊसाच्या शेतातून गेलेल्या विजेच्या तारांचा स्पर्श होऊन शाॅर्टसर्किट झाल्यामुळे ३ एकर ऊस जळाला आहे. ही घटना आज दि.२९ बुधवार रोजी सकाळी ७ वाजता घडली असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली.

गणपूर (ता.अर्धापूर) येथील शेतकरी बबन गजीराम बंडाळे यांच्या शेतातील गणपूर शिवारात गट क्र.१०६ मधून ३ एकर ऊसाच्या शेतातून महावितरण कंपनीची विद्युत पुरवठा करणारी तार जाते. यात कायम विद्युत पुरवठा सुरू असणाऱ्या या तारेतून आज अचानकपणे  शाॅटसर्किट होऊन ऊसाच्या फडाला आग लागली. सुरुवातीला काही ऊसाने पेट घेतला आणि काही वेळातच ऊसाचा फड जळून शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले झाले आहे. महावितरण कंपनीने जळालेल्या ऊसाची तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अन्यथा वीज वितरण कंपनीला न्यायालयात खेचू अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी बबन गजीराम बंडाळे यांनी यावेळी दिली.

वितरण कंपनीने पावलं उचलणे गरजेचे

महावितरण कंपनीच्या विद्युत प्रवाहामुळे शाॅटसर्किट होऊन पुन्हा ऊसाने पेटल्याची घटना घडली आहे. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. आज शेतकऱ्यांच्या शेतातील संपूर्ण ३ एकर मधील ऊस जळून नुकसान झाले आहे. विद्युत पुरवठ्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही यासाठी वीज वितरण कंपनीने पावले उचलणे गरजेचे आहे. ऊस जळीत प्रकरणी शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी प्रसार-प्रचार योजना तालुकाध्यक्ष तुळशीराम बंडाळे यांनी केली आहे.

लोणी शिवारात शाॅक लागल्याने म्हैस दगावली

अर्धापूर तालुक्यातील लोणी शिवारात शामराव लोणे या शेतकऱ्याची मैस ३३ केव्हीच्या विद्युत तारा तुटून शाॅक लागल्याने ठार झाली. यामुळे शेतकऱ्याचे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांनी केली आहे. अशाप्रकारे वीज वितरण कंपनीमुळे सातत्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!