Friday, July 19, 2024

अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या आरोपी कारचालकासह मुलीस गुजरातमधुन अटक; भाग्यनगर पथकाची कारवाई

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून अल्पवयीन मुलीला पळवून नेणार्‍या आरोपीस भाग्यनगर पोलिसांनी गुजरातमधुन अटक केली आहे.

दिनांक २१ जानेवारी रोजी भाग्यनगर पोलिस ठाण्यात गु.र.न. २५ / २०२२ कलम ३६३ भादंवि कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. दिनांक 22 जानेवारी रोजी शहरातून एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेल्याबदल तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणात cctv फुटेज आणि अनेक नंबर ट्रेस करून अखेर आरोपी (संतोष भंडारे) (कार चालक) याचा ठावठिकाणा शोधला. विवाहित कारचालक संतोष याने या अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेल्याचे तपासात निष्पन झाले. भाग्यनगर पोलिसांनी सायबर सेलची मदत घेऊन अहमदाबाद येथून या दोघांना ताब्यात घेतले. आरोपीसह पोलीस रेल्वेने अहमदाबाद (गुजरात) हुन नांदेडला आल्याची माहिती आहे.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे, अतिरिक्त पोलीस अधिक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी (ग्रामीण) अर्चना पाटील, पोलीस उपअधिक्षक  (शहर) चंद्रसेन देशमुख यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक सुधाकर आडे यांनी एक पथक नेमुन पोउपनि एन. जी. शेख, पोकों हाणवता कदम, रुपाली ढोणे यांचे पथक नेमून त्यांना योग्य त्या सुचना देऊन गुन्ह्यातील आरोपी व अल्पवयीन मुलीचा शोध घेण्याचे आदेश देण्यात आले होते. सदर पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सायबर शाखेची मदत घेवून वरिष्ठांची परवानगीने सदर पथकातील अधिकारी व अंमलदार यांना अहदमदाबाद (गुजरात) येथे रवाना करण्यात आले होते. सदर पथकाने तेथील स्थानिक पोलिसांची मदत घेवून आरोपी नामे संतोष मारोती भंडारे (वय २५ वर्ष) रा. बहादरपुरा ता. कंधार जि. नांदेड यांस व अल्पवयीन मुलीस ताब्यात घेतले आहे. सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि नवाज शेख, पोस्टे भाग्यनगर हे करीत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!