ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻
नांदेड- शहरामध्ये तलवार, खंजरसह गुन्हेगारी जगतात पिस्तुलांचाही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. अशाच प्रकारे अवैध पिस्तुल घेऊन फिरणाऱ्यास पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन पिस्तुलांसह जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. डीवायएसपी गुरव आणि एपीआय पवार यांच्या पथकाने ही कारवाई केली.
शहरात चिखलवाडी भागात पिस्तूल घेऊन फिरत असलेल्या आरोपीची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी (शहर) सुरज गुरव यांना मिळाली. त्यांनी लिंबगाव ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत पवार यांना सोबत घेऊन चिखलवाडी भागात सोमवार दि. २० नोव्हेंबरच्या रात्री अकराच्या सुमारास कारवाई करत सुमेर बैस या युवकास अटक केली. त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहेत. वजिराबाद पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांना मिळालेल्या माहितीवरून त्यांनी सोमवारी रात्री एपीआय चंद्रकांत पवार यांना सोबत घेऊन स्वतः पायी पेट्रोलिंग सुरू केली. यावेळी त्यांना गाडीपुरा भागात राहणारा सुमेर महेशसिंह बैस हा चिखलवाडी कॉर्नर परिसरात संशयास्पद फिरत असल्याचे आढळून आले. पोलीस पथकांनी सुमेर बैस याला ताब्यात घेतले. त्याची अंगझडती घेतली. यावेळी त्याच्याजवळ दोन पिस्तूल आणि सहा जिवंत काडतूस आढळून आल्याने ती जप्त करण्यात आली आहे. त्याची अधिक चौकशी वजिराबाद पोलीस करत असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻