Sunday, June 4, 2023

आंबेसांगवी नजीक महामार्गावर अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे; एकजण जागीच ठार, दोन गंभीर जखमी

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

◆ कंटेनर- ट्रॅक्टरचा भीषण अपघात

लोहा- राष्ट्रीय महामार्गावरील आंबेसांगवी नजीक नांदेडकडून येणाऱ्या भरधाव वेगातील कंटेनर ने ट्रॅक्टरला सामोरासमोर दिलेल्या जबर धडकेत एक जण जागीच ठार झाला आहे. ही धडक इतकी जबर होती की यात ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत.

ट्रॅक्टरवर बसलेल्या पैकी एकजण जागीच ठार झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. आज शुक्रवार दि. 4 रोजी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

नांदेड लातूर राष्ट्रीय महामार्ग क्र. 361 चे काम सुरू असल्याने खोद कामामुळे महामार्ग अरुंद झाला असून त्यामुळे अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. कंटेनर चालकास ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सोनखेड पोलिसांकडून देण्यात आली.

लोहा तालुक्यातील कारेगावनजीक लोह गड गुरुद्वारा येथे कार सेवक म्हणून काम करत असलेले तिघे जण दि. 4 रोजी शुक्रवारी दुपारी विना क्रमांकाचा नवीन ट्रॅक्टरचा हेड (तोंड) घेवून नांदेडकडे निघाले होते. यावेळी नागपूर वरून लातूरकडे गजाळी घेवून भरधाव वेगाने जाणारा कंटेनर क्र. एम एच ४९ ए टी १०३९ ने सोनखेड ते आंबेसांगवी दरम्यान राष्ट्रीय महामार्गावर ट्रॅक्टरला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की या धडकेने ट्रॅक्टरच्या हेडचे दोन तुकडे झाले. या अपघातात हेडवर बसलेला कुलदीप सिंग (वय ४०) रा. नांदेड याच्या अंगावरून ट्रॅक्टरचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. तर ट्रॅक्टर चालक सोनुसिंग (वय ३८) व अन्य एक (नाव समजू शकले नाही) असे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कंटेनर चालकास सोनखेड पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,797FollowersFollow
0SubscribersSubscribe

Latest Articles

error: Content is protected !!