Friday, February 23, 2024

आईच्या निधनाच्या दुःखाने मुलीला हृदयविकाराचा झटका; उपचार सुरू असतानाच नांदेडमध्ये झाला दुर्दैवी मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लोहा येथील विवाहित मुलगी

लोहा (जि. नांदेड)- आईच्या निधनाच्या दुःखाने लोहा येथील विवाहित मुलीला हृदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी नांदेड येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता, उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

आईच्या निधनानंतर मुलीनेही प्राण सोडल्याच्या ह्या हृदयद्रावक घटनेतील विवाहिता या लोहा तालुक्यातील डोंगरगाव येथील रहिवासी असून भागिरथी गंगाधर मठपती असे त्यांचे नाव आहे. परभणीजिल्ह्यातील फुलकळस (ता.पूर्णा) हे या विवाहितेचे माहेर आहे.

गयाबाई सारंग स्वामी यांचे रविवारी (ता.सहा) सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. डोंगरगाव (ता.लोहा) येथील मोठी मुलगी भागिरथी गंगाधर मठपती यांना त्यांच्या आईचे निधनाची माहिती देण्यात आली. त्या रविवारीच फुलकळस येथे पोहचल्या. दुपारी आई गयाबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधी करून सर्वजण घरी परतले. भागिरथी मठपती यांना आई गेल्याचे दुःख अनावर होत होते, त्यांना प्रचंड अस्वस्थ वाटू लागले होते. त्यांची स्थिती पाहून नातेवाईकांनी त्यांना नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास भागिरथी मठपती यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले.

त्यांच्यावर त्यांच्या गावी डोंगरगाव येथे सोमवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, दोन मुली, सून, जावई आणि नातवंडे असा परिवार आहे. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

[td_block_social_counter facebook="tagdiv" twitter="tagdivofficial" youtube="tagdiv" style="style8 td-social-boxed td-social-font-icons" tdc_css="eyJhbGwiOnsibWFyZ2luLWJvdHRvbSI6IjM4IiwiZGlzcGxheSI6IiJ9LCJwb3J0cmFpdCI6eyJtYXJnaW4tYm90dG9tIjoiMzAiLCJkaXNwbGF5IjoiIn0sInBvcnRyYWl0X21heF93aWR0aCI6MTAxOCwicG9ydHJhaXRfbWluX3dpZHRoIjo3Njh9" custom_title="Stay Connected" block_template_id="td_block_template_8" f_header_font_family="712" f_header_font_transform="uppercase" f_header_font_weight="500" f_header_font_size="17" border_color="#dd3333"]

Latest Articles

error: Content is protected !!