Saturday, July 27, 2024

आजपासून तीन दिवस चक्क जिल्हाधिकारी कार्यालयात भरणार शेतकऱ्यांचा बाजार; फळं, भाज्या, कडधान्यही विक्रीला

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड– आजपासून तीन दिवस चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात शेतकऱ्यांचा बाजार भरणार आहे. या बाजारात गावराण लसून पासून कडधान्यासह फळ, भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून खरेदीची संधी सर्वांना उपलब्ध असणार आहे.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या “विकेल ते पिकेल” या योजनेअंतर्गत दिनांक 20 मार्च पासून तीन दिवसीय धान्य महोत्सवाचा प्रारंभ होत आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध वैशिष्ट्य व गुणवत्तापूर्ण शेतमालाचे उत्पादन घेणारे अनेक प्रगतशील शेतकरी आहेत. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आपले उत्पादन थेट ग्राहकांपर्यंत कोणत्याही साखळी विना विकता यावे यासाठी जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी विशेष पुढाकार घेतला. शासनाच्या विकेल ते पिकेल या धोरणाअंतर्गत हा महोत्सव जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अधिकाधिक ग्राहकांपर्यंत पोहचला जावा या उद्देशाने घेतला जात आहे.

◆ विकेल ते पिकेल अभियानाअंतर्गत आजपासून धान्य महोत्सव; जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांचा विशेष पुढाकार


हा धान्य महोत्सव दिनांक 20, 21 व 22 असे सलग तीन दिवस होत असून सकाळी 10 ते सायं 6 वाजेपर्यंत सुरु राहील. कृषि विभाग व आत्मा यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन करण्यात आले आहे.  या धान्य महोत्सवात भारताच्या 75 व्या स्वातंत्र्य वर्षानिमित्त 75 भव्य शेतमाल‍ विक्री केंद्र असणार आहेत. यात शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला गहु, ज्वारी, तांदूळ, तुर, मुग, उडीद, चनाडाळ, हळद, मिरची, मसाले, विविध प्रकारचे सेंद्रीय उत्पादने (गुळ, हळद पावडर, सेंद्रीय डाळी) तसेच नाविन्यपूर्ण उत्पादने जसे, मध, गुळाचा पाक व महिला बचतगटांची उत्पादने (चटणी, लोणचे, पापड, कुरडई इत्यादी), टरबुज, खरबुज आदी फळे व भाजीपाला थेट विक्रीसाठी उपलब्ध राहणार असल्याची माहिती जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!