Tuesday, October 15, 2024

आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय परिसरात स्वच्छ भारत अभियान

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नवीन नांदेड- श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळाचे जवाहरलाल नेहरू समाजकार्य महाविद्यालय व संशोधन केंद्र सिडको नवीन नांदेड येथील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यमाने आजादी का अमृत महोत्सवनिमित्त स्वच्छ भारत अभियान राबविण्यात आले.

याअंतर्गत दि.२३ डिसेंबर रोजी महाविद्यालयाच्या परिसरात स्रावच्बछता मोहीम राबविण्यात आली. डॉ.नानासाहेब जाधव यांच्या सूचनेनुसार घेण्यात आलेल्या सदरील कार्यक्रम प्राचार्य डॉ. डब्ल्यू .आर. मुजावर यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमास प्राध्यापक डॉ. निरंजनकोर सरदार, प्रा.डॉ.एन जी .पाटील, प्रा.डॉ. मनीषा मांजरमकर, प्रा.डॉ. प्रतिभा लोखंडे, प्रा. डॉ. शेख, प्रा. डॉ सत्वशील वरघंटे, ग्रंथपाल सुनील राठोड यांचा सहभाग होता. या कार्यक्रमास रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. दिलीप काठोडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राष्ट्रीय कार्यात समाजकार्य विद्यार्थ्यांचा सहभाग असावा. आपण ज्या महाविद्यालयात शिकतो त्या महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ सुंदर असावा तसेच विद्यार्थ्यांना श्रमदानाचे महत्त्व पटवून देत महाविद्यालयीन परिसरात स्वच्छता करण्यात आली.

या कार्यक्रमास रासेयो स्वयंसेवक विश्वंभर रामटेके, बालाजी पांचाळ, प्रतीक कल्याणकर, हनुमान ढगे, जनार्धन मैठे, जुनेद शेख, राजू राठोड, भाले शुभम, श्रुती पांचाळ तसेच राष्ट्रीय सेवा योजनेच्या सर्व स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!