Tuesday, November 5, 2024

आजारी पित्यास भेटण्यास जाणाऱ्या पोलिसाचा अपघाती मृत्यू

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

लोहा (जि. नांदेड)- कर्तव्यावर असलेल्या मुलाला पित्याच्या तब्येत खालावल्याची माहिती मिळताच, त्यांना भेटण्यासाठी तो गावाकडे जात असताना पोलिस पुत्राचा अपघाती मृत्यू झाल्याचा घटना दि.४ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजेच्या दरम्यान लोहा ते गंगाखेड मार्गावर घडली या दुर्दैवी घटनेमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्‍त होत आहे. गंगाखेड येथाल मुळ रहावासी असलेले शंभुदेव सदाशिव घुगे (वय ३२) हे नांदेड जिल्हा पोलीस दलातील कर्मचारी असून ते सध्या पोलास मुख्यालयात कार्यरत आहेत. नियमित बंदोबस्ताच्या निमित्ताने सध्या त्यांना लोहा पोलास ठाण्यात पाठविण्यात आले होते. शनिवार दि.४ डिसेंबर रोजी रात्री आपल्या वडालांची तब्येत बरोबर नसल्याची माहिता मिळाल्यानंतर त्यांनी लोहा येथील पोलीस स्टेशनचे निरिक्षक संतोष तांबे यांची परवानगी घेवून ते दुचाकी गाडीने  गंगाखेड कडे जात असतांना पालम ते गंगाखेड या दरम्यान चार चाकी वाहन क्रमांक एम. एच.२४ एस.१८२२ या गाडीने त्यांना जोरदार धडक दिली आणि त्यात ते गंभार जखमी होवून जागीच मृत्यू पावले. गंगाखेडच्या पोलास निरिक्षक वसुंधरा बोरगावकर यांना घटनेचा माहिती मिळताच त्या घटनास्थळी पोहचल्या. या बाबत नांदेड पोलास दलाला माहिती दिला आणि पुढील कायदेशीर कार्यवाही केली. नांदेड जिल्हा पोलीस दलात या अपघाताने पोलीस अंमलदाराच्या मृत्यूबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!