Friday, July 19, 2024

आजोबा आणि नातू जागीच ठार; अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला उडवले

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

भोकर (जि. नांदेड)- तालुक्यातील हाळदा गावाजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने दुचाकीला दिलेल्या धडकेत दुचाकीवरील ७२ वर्षीय वृध्द आजोबा व त्यांच्या २० वर्षीय नातवाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज दि. ६ जानेवारी रोजी रात्री ८ : ३० वाजताच्या दरम्यान घडली आहे.

रामा नरसप्पा पटपेवाड  रा. पवना तालुका हिमायतनगर आणि हर्षवर्धन चंद्रकात दंतलवाड रा. चिंचाळा तालुका बिलोली असे अपघातात ठार झालेल्या वृध्द आजोबा व नातवाचे नाव आहे. वृध्द आजोबा हे बिलोलीमध्ये राहत असलेल्या मुलीकडे गेले होते. शुक्रवार दिनांक ६ रोजी ते आपल्या गावी पवनाकडे दुचाकी (क्र. एम एच २६ सीसी ९७६७) वरुन आपल्या नातवासोबत जात होते. याचदरम्यान भोकर तालुक्यातील हाळदा गावच्या नवी आबादीजवळ अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर  क्र. एम एच २६ बी क्यू ०७५० ने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील आजोबा आणि नातवाचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक अनिल कांबळे व पोलीस कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन ट्रॅक्टर चालकास ताब्यात घेतले असुन या अपघाताबाबत गुन्हा दाखल प्रक्रिया चालू होती. रेतीची रॉयल्टी व धक्के बंद असल्याने रात्री बे-रात्री अवैध रेती तस्करांचे प्रमाण वाढल्याने रात्री असे अपघात होत आहेत.

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!