Saturday, July 27, 2024

आज नाशिकजवळ रेल्वेला अपघात, एक जण ठार, 10 जखमी; नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही गाड्या अंशतः रद्द

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

नांदेड- कालच औरंगाबादजवळील दौलताबाद जवळ मालगाडीला अपघात झाल्याची घटना घडली असताना आज पुन्हा याच मार्गावर रेल्वेला अपघात झाला असून तर पॅसेंजर रेल्वेला अपघात झाला आहे.या अपघातामुळे नांदेडहून मुंबईला जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द, तर काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत.

इगतपुरी रेल्वे स्थानकाजवळ लोकमान्य टिळक टर्मिनस- जयनगर एक्सप्रेसचे 11 डबे रुळावरून घसरल्याची घटना घडली आहे. लहावीत ते देवळीली दरम्यान दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत.

इगतपुरीजवळील लहावीत ते देवळीली दरम्यान आज रविवारी दुपारी 3.10 वाजण्याच्या सुमारास डाऊन मार्गावर ही घटना घडली आहे. भुसावळ कडे जाणारी पवन दरभंगा एक्स्प्रेस इगतपुरी स्थानक सोडल्यानंतर नाशिककडे येत असताना लहवीत स्थानकादरम्यान रुळावरून घसरली. गाडीचा वेग तशी नव्वद किलोमीटर असल्याने वातानुकूलित व स्लीपर कोच दहा बोगी घसरून रुळापासून वेगळे झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात रूळ उखडले गेले. जखमी प्रवाशांना रुग्णवाहिकेद्वारे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. अपघातग्रस्त गाडीतील अन्य प्रवाशांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन आणि मनपा शहर बससेवेच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पाठविण्यात आल्या.

या घटनेची माहिती मिळताच अपघात निवारण विशेष वाहन आणि मेडिकल आणि बचाव पथकासह घटनास्थळी रवाना झाले आहे, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. घसरलेले डबे हटवून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. आपघातामुळे काही गाड्या रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. अपघाताच्या कारणांचा शोध घेण्यात येत आहे.

अपघातमुळे मनमाड पंचवटी एक्सप्रेस, मनमाड सीएसएमटी एक्सप्रेस आणि सीएसएमटीहुन नांदेडमार्गे अदिलाबादला जाणारी नंदीग्राम एक्सप्रेस या रद्द करण्यात आल्या आहेत. तर सीएसएमटी निझामुद्दीन राजधानी एक्सप्रेस, सीएसएमटी हावडा दुरांते एक्सप्रेस, एलटीटी प्रतापगड उद्योगनगरी एक्सप्रेस या गाड्या इतर मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.

मध्य रेल्वे मधील या अपघातामुळे नांदेड रेल्वे विभागातून मुंबई कडे येणाऱ्या आणि जाणाऱ्या काही रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही रेल्वे अंशतः रद्द करण्यात आल्या आहेत. त्या पुढील प्रमाणे आहेत:-

ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी क्लीक करा…👆🏻

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Latest Articles

error: Content is protected !!